डासांची फॅक्ट्री! कारखान्यात तयार केले जात आहेत डास, पण का? त्याचं करणार काय?

Last Updated:

Mosquito factory : हे आता जगातील सर्वात मोठं डास उत्पादन केंद्र बनलं आहे. इथं दर आठवड्याला सुमारे 100 दशलक्ष डासांची अंडी तयार होतात. पण हे सामान्य डास नाहीत.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : डासांपासून मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे बरेच आजार होतात. त्यामुळे डासांचा नायनाट करण्यासाठी उपाययोजना केल्या जात. डास होऊ नयेत, यासाठी काळजी घेतली जाते. असं असताना आता चक्क डासांची फॅक्ट्री सुरू करण्यात आली आहे, जिथं डासांची निर्मिती केली जाते. एकिकडे डास नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे डासांची निर्मिती केली जाते आहे, असं का? या डासांचं काय करणार? असा प्रश्न पडतोच.
डासांची फॅक्ट्री म्हटल्यावर ती कुठे आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. ही फॅक्ट्री आहे ब्राझीलमध्ये. इथलं क्युरिटिबा हे आता जगातील सर्वात मोठं डास उत्पादन केंद्र बनलं आहे. इथं दर आठवड्याला सुमारे 100 दशलक्ष डासांची अंडी तयार होतात. पण हे सामान्य डास नाहीत. या डासांमध्ये वोल्बाचिया बॅक्टेरिया आहेत. वोल्बाचिया हा एक नैसर्गिकरित्या आढळणारा जीवाणू आहे जो 60% पेक्षा जास्त कीटकांमध्ये आढळतो.  तो डेंग्यू, झिका आणि चिकनगुनियासारख्या विषाणूंना डासांच्या शरीरात पसरण्यापासून रोखतो.
advertisement
वोल्बाचिया संक्रमित डास उच्च जोखीम असलेल्या भागात सोडले जातात जिथं ते जंगली डासांसह प्रजनन करतात. त्यानंतर डासांच्या पुढील पिढीला वोल्बाचिया बॅक्टेरियाने सुरक्षित केलं जातं. इतर विषाणूंशी लढण्यासाठी संरक्षणात्मक जीवाणूंनी संक्रमित होतात.  डासांमध्ये इंजेक्शन दिल्याने ते कीटकांमध्ये विषाणू पसरण्यापासून रोखतात.
advertisement
ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने आधीच आठ शहरांमध्ये ही पद्धत लागू केली आहे. पाच दशलक्ष लोकांना संरक्षण देण्यात आलं आहे. नितेरोईमध्ये डेंग्यूच्या प्रकरणांमध्ये 69% घट झाली आहे. वर्ल्ड मॉस्किटो प्रोग्राम, ओस्वाल्डो क्रूझ फाउंडेशन आणि पराना इन्स्टिट्यूट ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी यांच्या संयुक्त नेतृत्वाखालील हा प्रकल्प प्राणघातक आजारांविरुद्धच्या लढाईत मदत करेल.
view comments
मराठी बातम्या/Viral/
डासांची फॅक्ट्री! कारखान्यात तयार केले जात आहेत डास, पण का? त्याचं करणार काय?
Next Article
advertisement
BJP vs Shiv Sena Ambernath : भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, अंबरनाथ नगर परिषदेत मोठी उलथापालथ, सगळा गेमच फिरला!
भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, गेमच फिरला अंबरनाथमध्ये उलथापाल
  • अंबरनाथ नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

  • शिवसेना शिंदे गटाची अंबरनाथमधून सत्ता उलथवण्यासाठी भाजपने जंग पछाडलं.

  • शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे भाजप पुरता घायाळ

View All
advertisement