केरळमधील त्रिशूर येथील रहिवासी असलेल्या रामचंद्रनची ही कहाणी त्याच्या शालेय जीवनापासून सुरू होते. त्याने सेंट थॉमस कॉलेजमधून बी.कॉम. पदवी घेतली आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर तो अकाउंटंट म्हणून काम करू लागला. जरी तो या नोकरीतून चांगले पैसे कमवत होता, परंतु सुरुवातीपासूनच त्याचं स्वप्न स्वतःचं काहीतरी करण्याचं होतं. रामचंद्रन नेहमीच एक सर्जनशील उत्पादन बनवण्याचा प्रयत्न करत असे.
advertisement
सुरुवातीपासूनच त्याच्या मनात कपडे धुण्याचं व्हाइटनर बनवण्याचं स्वप्न होतं. यासाठी तो प्रयत्न करत राहिला पण त्याला यश मिळालं नाही. शेवटी एका मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात त्याला यशाचं सूत्र सापडलं. या लेखात कपडे अधिक पांढरे आणि चमकदार बनवणारे पर्पर व्हाइटनर कसं बनवायचं ते सांगितलं होतं. या लेखाच्या आधारे रामचंद्रनने ते एक वर्ष बनवण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याला यश मिळालं आणि रामचंद्रन यांनी ते व्हाइटनर बनवलंच.
फॉर्म्युला मिळाल्यानंतर रामचंद्रन यांनी 1983 मध्ये 5 हजार रुपयांचे कर्ज घेतलं आणि त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर एक छोटी प्रयोगशाळा उभारून काम सुरू केलं. त्यांनी या प्रयोगशाळेचं नाव त्यांच्या मुलीच्या नावावर ठेवलं आणि एक छोटासा कारखाना सुरू केला. सुरुवातीला त्यांनी काही उत्पादने बनवली, पण खरं यश 'उजाला सुप्रीम लिक्विड फॅब्रिक व्हाइटनर' नावाच्या उत्पादनामुळे मिळालं. हे स्वस्त उत्पादन देशभरात आवडलं आणि प्रत्येक घराचा भाग बनलं.
रामचंद्रन यांच्या कंपनीला आणि त्यांच्या उत्पादनांना प्रथम दक्षिण भारतात यश मिळालं आणि 1997 मध्ये त्यांनी उत्तर भारतातही त्यांची उत्पादनं वाढवायला सुरुवात केली. हळूहळू हे उत्पादन देशभरात पसंत केलं जाऊ लागले. जवळजवळ एक दशकाच्या अथक परिश्रमानंतर, रामचंद्रन यांच्या ज्योती लॅबने बनवलेल्या उत्पादनांनी त्यांचं नशीब बदलले. आज या कंपनीच्या उत्पादनांना देशभरात पसंती दिली जाते. ज्योती लॅबचे बाजार भांडवल देखील सुमारे 17 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे.
रामचंद्रन यांची कंपनी ज्योती लॅब्सने उजाला व्हाईटनरनंतर अनेक उत्पादनं बनवली आहेत, जी आज देशभरात पसंत केली जातात. कंपनीच्या सर्वाधिक पसंतीच्या उत्पादनांमध्ये उजाला, हेन्को, मिस्टर व्हाईट, मोअर लाईट, एक्सो आणि प्रिलसारखी डिश वॉश, मार्गो, नीम आणि फा सारखी पर्सनल केअर प्रोडक्ट, मॅक्सो, टी-शाईन, माया अगरबत्तीसारखी होम केअर प्रोडक्टचा समावेश आहे. कंपनी कीटक आणि डास प्रतिबंधक उत्पादनंदेखील बनवत आहे.