रणरणत्या वाळवंटात सोडलं अब्जावधी लीटर पाणी, नंतर जे घडलं त्याची कल्पनाही कुणी केली नव्हती, तज्ज्ञही थक्क
- Published by:Priya Lad
Last Updated:
Water in Desert : मानवांनी निसर्गाच्या मर्यादांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. रणरणत्या वाळवंटात त्यांनी अब्जावधी लीटर पाणी सोडलं आणि त्या बदल्यात निसर्गाने त्यांना अशी भेट दिली ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती. जणू चमत्कारच घडला.
नवी दिल्ली : जेव्हा मानव निसर्गाविरुद्ध युद्ध करतो तेव्हा त्याचे परिणाम नेहमीच अनपेक्षित असतात. इजिप्तच्या वाळवंटातही असंच काहीसं घडलं. जिथं मानवांनी निसर्गाच्या मर्यादांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. रणरणत्या वाळवंटात त्यांनी अब्जावधी लीटर पाणी सोडलं आणि त्या बदल्यात निसर्गाने त्यांना अशी भेट दिली ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती. जणू चमत्कारच घडला.
ही कहाणी आहे इजिप्तच्या सर्वात महत्त्वाकांक्षी न्यू व्हॅली प्रोजेक्टची. ज्याचा उद्देश सहारा वाळवंटाचा एक मोठा भाग सुपीक जमिनीत रूपांतरित करणं होता. हा प्रकल्प खूप महत्त्वाचा होता कारण इजिप्तचे 95% पेक्षा जास्त लोक नाईल नदीकाठी असलेल्या फक्त 5% जमिनीवर राहतात. या प्रचंड आव्हानाला तोंड देण्यासाठी इजिप्शियन अभियंत्यांनी एक उत्तम योजना आखली. त्यांनी जगातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव असलेल्या नासेर सरोवरातून अतिरिक्त पाणी काढण्याचा निर्णय घेतला.
advertisement
हे पाणी वाळवंटात नेण्यासाठी जगातील सर्वात मोठं पम्पिंग स्टेशन मुबारक पम्पिंग स्टेशन बांधण्यात आलं. त्यात 24 शक्तिशाली पंप होते, जे दररोज लाखो घनमीटर पाणी उचलत होते आणि शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या शेख झायेद कालव्यात सोडत होते. या कालव्याचा उद्देश वाळवंटात खोलवर जीवनदायी पाणी पोहोचवणं, ज्यामुळे तिथं शेती सक्षम होईल हा होता. हा प्रकल्प केवळ एक अभियांत्रिकी चमत्कार नव्हता, तर इजिप्तच्या भविष्यासाठी एक आशा होती. पण पुढे जे घडले ते अभूतपूर्व होतं.
advertisement
2000 च्या सुमारास नासेर सरोवरातील पाण्याची पातळी इतकी वाढली की शास्त्रज्ञांना वाळवंटातील खोल सखल प्रदेशात पाणी सोडावं लागलं. परिणामी एका रात्रीत सहा मोठे सरोवर तयार झाले. या सरोवरांना तोष्का सरोवरे असं नाव देण्यात आलं आणि उपग्रहावरून पाहिल्यास ते एका चमत्कारासारखं दिसत होते. जिथं एकेकाळी फक्त वाळू आणि सूर्यप्रकाश होता, तिथं आता पाणी, वनस्पती, पक्षी आणि मासे होते. तोष्का सरोवर एक नवीन परिसंस्था बनली, ज्यामुळे वाळवंट हिरवेगार झालं. जणू काही निसर्गाने इजिप्तच्या कठोर परिश्रमाला आणखी एक भेट दिली आहे.
advertisement
पण हा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीच्या यशानंतर प्रकल्पाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. पाण्याची किंमत जास्त होती, जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढत होते आणि तीव्र वाळवंटातील उष्णतेमध्ये पाणी लवकर बाष्पीभवन होत होतं. 2011 नंतर इजिप्तमध्ये राजकीय अस्थिरतेमुळेही हा प्रकल्प थांबला आणि तोष्का तलाव सुकू लागलं.
advertisement
असं वाटत होतं की हे स्वप्न अपूर्ण राहील. पण 2014 नंतर इजिप्तच्या नवीन सरकारने या प्रकल्पाचं पुनरुज्जीवन केलं आणि त्याला राष्ट्रीय प्राधान्य दिलं. यावेळी भूतकाळातील चुकांपासून शिकत त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यांनी पिव्होट इरिगेशनसारख्या आधुनिक सिंचन प्रणालींचा अवलंब केला, ज्यामुळे पाणी वाया जाण्यापासून रोखलं गेलं. या नवीन तंत्रज्ञानामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला. आज तोष्का प्रदेशातील लाखो एकर वाळवंट हे हिरवेगार शेतजमीन आहे, जिथं गहू आणि खजूरसारखी पिकं घेतली जातात. हा प्रकल्प केवळ इजिप्तची अन्न सुरक्षा मजबूत करत नाही तर लाखो लोकांसाठी रोजगार निर्माण करत आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
Sep 17, 2025 12:39 PM IST
मराठी बातम्या/Viral/
रणरणत्या वाळवंटात सोडलं अब्जावधी लीटर पाणी, नंतर जे घडलं त्याची कल्पनाही कुणी केली नव्हती, तज्ज्ञही थक्क








