एका 20 वर्षांच्या महिलेने तब्बल 5 मुलींना जन्म दिला आहे. बिहारच्या किशनगंज जिल्ह्यात ही घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वांना मोठे आश्चर्य होत असून या घटनेची परिसरात एकच चर्चा होत आहे. सर्व मुलींचे वजन हे 1 किलोच्या आत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सर्व मुली या आरोग्यदायी आहेत. अनेक जणांना या घटनेवर विश्वास बसत नाही आहे.
advertisement
heatstroke : उन्हाळ्यात वाढला आजारांचा धोका, या गोष्टी ठरतील शरीराला खूपच फायदेशीर
ताहिरा बेगम असे या 20 वर्षीय महिलेचे नाव आहे. ती ठाकूरगंज कनकपुर येथील जालमिलिक गावातील रहिवासी आहे. ताहिरा बेगम ही एका खासगी नर्सिंग होममध्ये उपचार घेत होती. याबाबत तिने सांगितले की, ती जेव्हा 2 महिन्यांची गर्भवती होती, तेव्हा तिला तिच्या पोटात चार बाळ असल्याची माहिती मिळाली होती. नंतर डॉक्टरकडे जाऊन तपासणी केल्यावर 4 नव्हे तर 5 बाळ असल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला मी खूप घाबरली होती. मात्र, नंतर डॉक्टरने विश्वास दिला तसेच सर्व काही ठिक होईल, असे सांगत माझा आत्मविश्वास वाढवल्याचे तिने सांगितले.
या महिलेची प्रसूती करणाऱ्या डॉ. फर्जाना यांनी सांगितले की, हे प्रकरण आव्हानात्मक होते. तसेच अशा घटना खूप कमी पाहायला मिळतात. पण विशेष म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीने डॉक्टरांचा जन्म झाल्याचे त्यांनी सांगितले.
लग्नाचे अर्धे विधी पार पडले अन् मध्येच घडलं भयानक कांड, वरानं मंडपंच सोडला, नेमकं काय झालं?
अल्ट्रासाउंडमध्ये जेव्हा याबाबत माहिती झाले, तेव्हा महिला खूपच घाबरली होती. मात्र, आम्ही तिचा आत्मविश्वास वाढवला. संपूर्ण 9 महिने रेग्युलर चेकअप सुरू होते. मागच्या शनिवारी सकाळी ताहिरा हिला त्रास होऊ लागल्याने तिला क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. हे प्रकरण खूप आव्हानात्मक होते. मात्र, नॉर्मल डिलिव्हरीने डॉक्टरांनी प्रसूती केली आणि ताहिरा हिला पाचही मुली झाल्या. दरम्यान, ताहिरा आता दुसऱ्यांदा आई बनली आहे. तिला एक ती वर्षांचा मुलगा आहे. आता ती 6 बालकांची आई झाली आहे.