इन्स्टाग्राम यूजर शिवांगी खन्नाने अलीकडेच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने भारतातील एकमेव किल्ल्याबद्दल सांगितले आहे, ज्यात हजारो लोक भाडे न भरता राहतात. या शहराचे नाव जैसलमेर आहे, जिथे हा किल्ला आहे. किल्ल्याला 'सोनार किल्ला' असेही म्हणतात. याला भारतातील एकमेव 'लिविंग फोर्ट' असेही म्हटले जाते. कारण, किल्ल्याच्या आत सुमारे 4000 लोक राहतात.
advertisement
येथे घराबाहेर रंगवली जाते लग्नाची पत्रिका
शिवांगीने व्हिडिओमध्ये किल्ल्याबद्दल अनेक मनोरंजक गोष्टी सांगितल्या. तिने सांगितले की, "किल्ल्यात गांजा कायदेशीर आहे. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे येथे राहणारे लोक त्यांच्या घराबाहेर लग्नाची पत्रिका रंगवून ठेवतात. ती एका घरासमोर उभी होती ज्यावर गणेशजींचे चित्र होते आणि लग्नाची संपूर्ण माहिती त्यावर लिहिलेली होती. जो कोणी ती पत्रिका पाहतो तो लग्नाला येऊ शकतो. जैसलमेरला गोल्डन सिटी (Golden City) असेही म्हणतात. जैसलमेरचा किल्ला राजा रावल जैसल यांनी 1156 मध्ये बांधला होता."
व्हिडिओ होतोय चांगलाच व्हायरल
या व्हिडिओला सुमारे 6 लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेक लोकांनी कमेंट करून आपला प्रतिसाद दिला आहे. एकाने म्हटले की, लग्नाची पत्रिका रंगवणे खूप मनोरंजक दिसते. एकाने म्हटले की, चित्तोडगडमध्येही लोक राहतात. एकाने म्हटले की, जैसलमेर हे त्याचे आवडते ठिकाण आहे. एकाने म्हटले की, राजस्थानच्या अनेक शहरांमध्ये लग्नाची पत्रिका रंगवली जाते.
हे ही वाचा : मच्छीमाराचं चमकलं नशीब! समुद्रात फेकलं जाळं अन् हाती 'बाहुबली मासा', लिलावात मिळाले 'इतके' कोटी
हे ही वाचा : General Knowledge : अशी कोणती गोष्ट आहे जी रात्री पांढरी, संध्याकाळी निळी, दुपारी काळी आणि सकाळी हिरवी दिसते?