TRENDING:

आठवी फेल मुलाने उभारली 50000 कोटी रुपयांची बँक; बड्या बड्या बँकांनाही फुटला घाम

Last Updated:

उधार घेतलेल्या पैशातून स्मॉल फायनान्स बिझनेस सुरू केला. हळूहळू कंपनी मोठी होत गेली. आज ती कंपनी एका बँकेत बदलली आहे, ज्याचे मार्केट कॅप सुमारे 50,000 कोटी रुपये आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : बँकेत नोकरी जरी करायची म्हटली तरी परीक्षा द्याव्या लागतात. पण एक आठवी फेल मुलगा ज्याने स्वतःचीच बँक उभारली. बड्या बड्या बँकांनाही त्याने मागे टाकलं. त्याने एक फायनान्स कंपनीची स्थापना केली जी आज 49,698 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह प्रसिद्ध बँकेत रूपांतरित केली आहे. या व्यक्तीचं नाव आहे संजय अग्रवाल.
News18
News18
advertisement

संजय अग्रवाल यांचा जन्म राजस्थानच्या पिंक सिटी जयपूरमध्ये झाला. इयत्ता आठवी हा प्राथमिक शिक्षणाचा महत्त्वाचा टप्पा आहे, पण त्यात तो नापास झाला. कसंबसं त्याने शिक्षण केलं आणि नंतर सीएची परीक्षा दिला. त्यातही तो दोनदा नापास झाला. मात्र तिसऱ्यांदा मेहनतीमुळे त्याला सीएच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळालं. नोकरी केली पण त्यात रस नाही. अखेर 1996 मध्ये त्याने 5 लोकांकडून पैसे घेऊन NBFC (Non Banking Financial Company) स्थापन केली. त्याचं नाव AU Financiers होतं. ही तीच कंपनी आहे, जिला आज तुम्ही AU Small Finance Bank म्हणून ओळखता.

advertisement

एका घोटाळ्याने घाबरले गुंतवणूकदार

उधार घेतलेल्या पैशाने सुरू झालेली छोटी NBFC बँकेत बदलली. पण या 28 वर्षांचा प्रवास सोपा नाही.  NBFC च्या स्थापनेनंतर, 1997 मध्ये चैन रूप भन्साळी 1200 कोटींचा घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्यामुळे लोकांचा एनबीएफसीवरील विश्वास डळमळीत झाला. परिस्थिती अशी झाली होती की लोक एनबीएफसीच्या नावापासून दूर पळू लागले. अशा परिस्थितीत संजय अग्रवाल यांच्या एयू फायनान्सर्ससमोरही मोठी समस्या निर्माण झाली.

advertisement

फक्त आठवी पास व्यक्तीने करुन दाखवलं, नोकरी न करता आज वर्षाला कमावतोय कोट्यवधी रुपये, प्रेरणादायी गोष्ट!

एका बाजूला बिझनेसचा तीनतेरा वाजले होते तर दुसरीकडे त्यांची बहीण अरुणा कॅन्सरशी झुंज देत होती. 2000 मध्ये ते बहिणीच्या उपचारासाठी लंडनला गेले होते. लंडनला गेल्याने त्यांच्या आयुष्यात एक कलाटणी आली. भावाचं कर्तव्य पार पाडत संजय अग्रवाल आपल्या बहिणीला कॅन्सरपासून वाचवून जयपूरला परतले. परतल्यानंतर त्यांनी वित्तपुरवठा व्यवसायाला नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 2003 मध्ये HDFC ने संजय अग्रवाल यांच्या AU Financiers सोबत भागीदारी केली.

advertisement

एचडीएफसीसोबतच्या भागीदारीमुळे चित्र बदललं

AU हे सोन्याचं प्रतीकात्मक नाव आहे. हा शब्द लॅटिन शब्द Auram पासून बनलेला आहे. या शब्दाची पहिली दोन अक्षरं वापरून सोन्याला एक चिन्ह दिलं आहे. AU हे HDFC ग्राहकांसाठी सोने खरेदी-विक्रीचं साधन बनलं. तसंच ग्रामीण भागात वाहनांसाठी अवघ्या 18 टक्के वार्षिक व्याजाने 24 तासांत कर्ज मंजूर होऊ लागले.

advertisement

कंपनी सतत चांगलं काम करत होती व्यापार जगतात असा नियम आहे की जेव्हा जेव्हा एखादी नवीन कंपनी चांगलं काम करते तेव्हा मोठ्या गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेते. संजय अग्रवाल यांच्या कंपनीची मोतीलाल ओसवाल प्रायव्हेट इक्विटीने दखल घेतली. मोतीलाल यांनी AU Financiers मध्ये 20 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

19 एप्रिल 2017 हा महत्त्वाचा दिवस

कंपनीने वाहन कर्जासाठी सुझुकी आणि टाटा मोटर्स आणि गृहकर्जासाठी नॅशनल हाऊसिंग कंपनीसोबत भागीदारी केली. जेव्हा AU पुढे सरकलं तेव्हा 250 कोटी रुपयांची गुंतवणूक आली. गुंतवणूकदारांमध्ये वॉरबर्ग पिंकस, ख्रिस कॅपिटल आणि आयएफसी यांचा समावेश होता.

सप्टेंबर 2013 पर्यंत कंपनीनं लोकांना 4200 कोटी रुपयांचे कर्ज दिलं होतं. संजय अग्रवाल सतत मेहनत करत राहिले आणि मग विश्वही त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. 2015 मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वित्त क्षेत्रात एक क्रांतिकारी घोषणा केली. बँकिंग क्षेत्रासाठी एक नवीन श्रेणी तयार करण्यात आली – स्मॉल फायनान्स बँक. त्यानंतर AU ही एकमेव NBFC होती जी परवाना मिळवण्यात यशस्वी झाली. संजय अग्रवाल 19 एप्रिल 2017 आयुष्यभर विसरणार नाहीत, कारण या दिवशी AU Small Finance Bank ची स्थापना झाली.

Money Magnet : पैसे देताना मनात फक्त 'हा' नंबर म्हणा; दुप्पट होईल तुमच्या खिशातला पैसा

IPO आला तेव्हा लोकांना धक्का

2017 मध्ये कंपनीने 1912.51 कोटी रुपयांचा IPO आणला. लोकांना इतका विश्वास होता की ते 53 वेळा सबस्क्राइब झाले. अशाप्रकारे, नोव्हेंबर 2017 मध्ये ती अनुसूचित व्यावसायिक बँक बनली. मार्च 2018 मध्ये, या बँकेने 11 राज्यांमध्ये 306 शाखा उघडल्या आणि 292 एटीएम बसवले. अल्पावधीतच ती Fortune India 500 कंपनी बनली. हा एक असा समूह आहे जिथपर्यंत पोहोचणं प्रत्येक कंपनीला शक्य नाही. आज AU स्मॉल फायनान्स बँकेची 21 राज्यांमध्ये उपस्थिती आहे आणि तिच्या 2383 शाखा आहेत. बँकेचे 1.1 कोटी ग्राहक आहेत.

खासगी बँकांना घाम फुटला

AU Small Finance Bank मध्ये, 7.25 टक्के व्याज फक्त बचत खात्यावर उपलब्ध आहे. 7 जून 2024 रोजी सुधारित FD दरांनुसार, 18 महिन्यांच्या FD वरील व्याज दर 8.24 टक्के (वार्षिक) आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीसाठी FD वर ८.७७% व्याज मिळते. उच्च व्याजदरांमुळे, आजकाल लोक एफडी घेण्यासाठी स्मॉल फायनान्स बँकांकडे वळतात. अशा परिस्थितीत एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेसारख्या मोठ्या व्यावसायिक बँकांनाही घाम फुटला आहे, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांचा अतूट विश्वास

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

ही आता एक लिस्टेड कंपनी असल्याने, तिच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नचा सहज मागोवा घेता येतो. या पॅटर्नमधील विशेष बाब म्हणजे यामध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा (एफआयआय) सर्वाधिक हिस्सा आहे. त्यांच्याकडे 39.36 टक्के हिस्सा आहे, तर प्रवर्तकांकडे फक्त 25.45 टक्के हिस्सा आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (DII) देखील बँकेवर पूर्ण विश्वास आहे. त्यांची हिस्सेदारी 22.79 टक्के आहे. संजय अग्रवाल यांची प्रवर्तकांमध्ये 17.58 टक्के हिस्सेदारी आहे.

मराठी बातम्या/Viral/
आठवी फेल मुलाने उभारली 50000 कोटी रुपयांची बँक; बड्या बड्या बँकांनाही फुटला घाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल