कंटेंट क्रिएटरचा अनोखा प्रयोग
शुभदीप पॉल (मूसा जिंदा है) हा एक कंटेंट क्रिएटर आहे. तो अनेकदा स्वतःला आव्हान देणारे व्हिडिओ पोस्ट करतो. अलीकडेच, त्याने स्वतःला भिकारी बनण्याचे आव्हान दिले. तो एक दिवस भिकारी बनला. व्हिडिओच्या सुरुवातीला तो म्हणाला, "आज मी भीक मागून दिवसभरात किती पैसे जमा करू शकतो, ते पाहणार आहे."
advertisement
रस्त्यावर भीक मागण्याचा प्रयत्न
यानंतर तो रस्त्यावर भीक मागण्यासाठी गेला. सर्वप्रथम तो एका गर्दीच्या रस्त्यावर पोहोचला आणि बाईकस्वारांकडून पैसे मागू लागला. रस्त्यावर इकडे तिकडे फिरूनही त्याला काही मिळाले नाही. मग तो रेल्वे स्टेशनवर पोहोचला. पैसे मिळवण्यापेक्षा त्याला लोकांकडून जास्त सल्ले मिळू लागले. लोक म्हणू लागले की, तो तरुण मुलगा आहे, तो सशक्त आहे, असे असूनही तो भीक का मागत आहे, त्याने काहीतरी काम करावे. काही लोकांनी त्याला मदत केली आणि पैसे दिले. अखेर त्या माणसाने सांगितले की, त्याने 90 रुपये जमा केले आहेत. मग त्याने ते पैसे एका खऱ्या गरीब आणि बेघर महिलेला दिले.
व्हिडिओ आल्या उलट-सुलट प्रतिक्रिया
हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओला 15 लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेक लोकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले की, "त्याने गरिबांकडून 90 रुपयेही हिसकावले!" आणखी एक युजर्सने मजेशीरपणे म्हटले की, "या व्यक्तीने या कामाचा अनुभव त्याच्या सीव्हीमध्ये टाकावा." तर आणखी एकाने म्हटले की, "भिकारी टोळीने मुलाला का पकडले नाही? कारण तो त्यांच्या परिसरात भीक मागत होता!" आणखी एकजण म्हणतो की, "मुलाचा आत्मविश्वास खूपच चांगला आहे."
हे ही वाचा : एकमेव किल्ला, जिथे आजही राहतात 4000 लोक! भारतात कुठे आहे हा किल्ला?
हे ही वाचा : मच्छीमाराचं चमकलं नशीब! समुद्रात फेकलं जाळं अन् हाती 'बाहुबली मासा', लिलावात मिळाले 'इतके' कोटी\