TRENDING:

बाप रे! रेल्वे रुळावर आला 'सिंह', वनरक्षकाने काठीने सहज हाकललं, पहा VIDEO

Last Updated:

गुजरातमध्ये एका वनरक्षकाने रेल्वे ट्रॅकवर आलेल्या सिंहाला शांतपणे काठीच्या साहाय्याने हटवले. रक्षकाच्या धाडसाने सिंह आक्रमक न होता पुढे गेला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रक्षकाच्या धैर्याचे कौतुक होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गुजरातमध्ये एका वनरक्षकाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात तो एका सिंहाला रेल्वे रुळ ओलांडताना निर्भयपणे हुसकावताना दिसत आहे.
News18
News18
advertisement

6 जानेवारी रोजी चित्रित केलेल्या फुटेजमध्ये, हा रक्षक अगदी सहजपणे काठीचा वापर करून सिंहाला रुळावरून बाजूला करतो, जसे एखाद्या गाय किंवा मेंढीला हाकलतो.

व्हिडिओमध्ये, रक्षक आणि सिंह यांच्यात काही मीटरचेच अंतर आहे. सिंह क्षणभर थांबून रक्षकाकडे पाहतो आणि मग पुढे निघून जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सिंह आक्रमक दिसत नाही किंवा रक्षकावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत नाही, तर रक्षक पूर्णपणे शांत राहतो. एक व्यक्ती दूरून हे दृश्य रेकॉर्ड करताना दिसत आहे.

advertisement

advertisement

एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे जनसंपर्क अधिकारी शंभुजी यांनी सांगितले की, "ही घटना लिलीया रेल्वे स्टेशनच्या एलसी-31 गेटजवळ दुपारी 3 च्या सुमारास घडली होती."

या घटनेमुळे सोशल मीडियावर वनरक्षकाच्या धैर्याचे आणि सतर्कतेचे खूप कौतुक होत आहे. अनेकजण त्याचे अभिनंदन करत आहेत.

हे ही वाचा : VIRAL VIDEO : तो एका दिवसासाठी बनला भिकारी, रस्त्यावर फिरून मागितले पैसे, कमाई पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य 

advertisement

हे ही वाचा : एकमेव किल्ला, जिथे आजही राहतात 4000 लोक! भारतात कुठे आहे हा किल्ला?  

मराठी बातम्या/Viral/
बाप रे! रेल्वे रुळावर आला 'सिंह', वनरक्षकाने काठीने सहज हाकललं, पहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल