एका व्यक्तीच्या पोटात दुखत होतं. त्यानंतर काही वेळानं त्याला उलटी झाली आणि पोटातून एक किडा बाहेर पडला. हा किडा भरपूर मोठा होता. हे पाहून व्यक्ती घाबरला आणि हॉस्पिटलला पोहोचला. हे प्रकरण पाहून डॉक्टरही चक्रावले.
summer tips : घरात AC चालू, फॅन, लाईटही, मग बिल कसं कमी करायचं? सोप्पा फॉर्म्युला
advertisement
समोर आलेलं हे प्रकरण खूपच विचित्र आणि धक्कादायक आहे. एका व्यक्तीचं पोट दुखत होतं. त्यानंतर तो एका मेडिकलमध्ये गेला आणि पोटदुखीची गोळी आणली. जेवणाच्या काही तासानंतर त्याला उलटी झाली. त्याच्या पोटातून जिवंत गांडूळ बाहेर पडलं. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बेसिनमध्ये हा किडा वळवळताना दिसतोय.
@StarBede नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या पेशंटचा हा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला. डॉक्टरने त्याला विचारलं की शेवटचे जंत कधी काढले होते तर पेशंटनं सांगितलं की बरेच वर्ष झाले.
दरम्यान, अशा अनेक धक्कादायक आणि वेगळ्या घटना घडत असतात. कोणासोबत कधी काय घडेल सांगू शकत नाही. असे काही ना काही घटना सतत सोशल मीडियावर समोर येत असतात.