असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर आता या व्यक्तीला रोहित शेट्टी शोधत असल्याचं देखील नेटकरी गंमतीनं म्हणत आहेत.
व्हायरल व्हिडीओत काय घडलं?
या व्हिडीओत रस्त्याच्यामध्ये असलेल्या डिवायडरला ठोकर झाल्यामुळे एका बाईक चालकाचा अपघात झाला. अपघात झालेल्या व्यक्तीचं नशिब इतकं चांगलं होतं की एवढा मोठा अपघात होऊन देखील त्याला कीहीही झालं नाही.
advertisement
खरंतर रस्त्याच्यामध्ये असलेल्या डिवायडरचा अंदाज न आल्याने भरधाव वेगाने आलेली बाईक त्यावर जोरदार आदळली ज्यामुळे बाईक चालक काही फूट उंच आकाशात उडाला आणि रस्त्याच्या दुसऱ्याबाजूला असलेल्या एका टॅम्पोच्या बोनटवर जाऊन पडला.
नशिबाने त्या टेम्पो चालकाने अपघात झाल्याचं दिसताच आपल्या गाडीला ब्रेक मारला ज्यामुळे बाईकचालकाचं फारसं नुकसान झालं नाही. तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की कसा बाईक चालक टॅम्पो बोनटवर पडतो आणि मग उठून उभा रहातो. त्याच्या बाईकची तर वाट लागले, मात्र त्याचे प्राण वाचले आहेत. ज्यामुळे त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना एका X युजरने लिहिले,'व्हिडीओ पाहिल्यानंतर रोहित शेट्टीचे 99 मिस्ड कॉल.' नेटकऱ्यांनी या व्हिडीओची मजा घेतली आहे आणि त्यावर जोरदार कमेंट्स देखील केल्या आहेत.