जमुई : लग्न हे सात जन्माचे बंधन असते. लग्न झाल्यावर पती-पत्नी एक दुसऱ्यासोबत संपूर्ण जीवन राहण्याची शपथ घेतात. मात्र, एका व्यक्तीसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. त्याची पत्नी त्याला पुन्हा पुन्हा सोडून जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. आता त्याच्या पत्नीने पळून जाण्याचा रेकॉर्डच केला आहे. आता पुन्हा त्याची पत्नी त्याला सोडून फरार झाली आहे. यानंतर आता हा व्यक्ती आपल्या पत्नीचा शोध घेत आहे.
advertisement
नेमकं काय घडलं -
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण, त्या व्यक्तीची पत्नी त्याला सोडून याआधीही अनेकदा पळून गेली आहे. ही धक्कादायक घटना बिहारच्या जमुई जिल्ह्यातील बरहट पोलीस ठाणे हद्दीतील आहे. याठिकाणी या व्यक्तीची पत्नी छोट्या छोट्या गोष्टींवरुन त्याला सोडून पळून जाते.
2005 मध्ये झाले होते लग्न, बाळ झाल्यावर पळून गेली -
नूमर गावातील रहिवासी असलेल्या रामविलास कुमार सिंह याच्या पत्नीची ही कहाणी आहे. त्याचे लग्न 2005 मध्ये बरबीघा परिसरातील रहिवासी असलेल्या पुतुल देवीसोबत झाली होती. रामविलास दिव्यांग असल्याने त्याच्या पत्नीने त्यासोबत राहून त्याची सेवा करण्याचा सल्ला विश्वास दिला होता. यानंतर दोघांनी मंदिरात लग्न केले. मात्र, लग्नानंतर जेव्हा रामविलास आणि पुतुल यांना पहिले बाळ झाल्यावर पुतुल देवी आपल्या पतीला म्हणजे रामविलासला सोडून पळून गेली.
नवरा कामानिमित्त राहायचा घराबाहेर, बायको कायम घरी बॉयफ्रेंडला बोलवायची, शेवटी सत्य समोर आलं अन्...
यानंतर मोठ्या कसरतीने चंदीगढ येथे जाऊन रामविलास सिंह याने आपल्या पत्नीला समजावून आपल्या घरी परत आणले होते. यानंतर काही दिवस सर्व ठिक राहिले. मात्र, दुसरे बाळ झाल्यावरही त्याची पत्नी पळून गेली.
रामविलास सिंह याने सांगितले की, त्याची पत्नी आतापर्यंत चारवेळा पळून गेली आहे. यानंतर आता ती पाचव्यांदा पळून गेली आहे. त्याची पत्नी आता त्याच्यासोबत राहू इच्छित नाही. फोनवर तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या पत्नीने त्याचे काहीही ऐकले नाही. आता ती त्यांचा 7 मुलगा वर्षांचा मुलगा बादल आणि 4 वर्षांचा मुलगा आकाश या दोघांना सोबत घेऊन पळाली आहे. आपली दोन्ही मुले परत द्यावीत, अशी मागणी त्याने केली असता त्याच्या पत्नीने यालाही नकार दिला.
यानंतर आता असहाय्य पतीजवळ कोणताही पर्याय उरला नाही. त्यामुळे त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली आणि आपल्या पत्नीचा शोध घ्यावा, अशी मागणी केली. तर याबाबतची माहिती मिळाली आहे. तसेच पोलीस तक्रार अर्जाच्या आधारावर पुढील तपास करत आहे, अशी माहिती बरहट पोलीस ठाण्याचे प्रमुख संजीव कुमार यांनी दिली आहे.