TRENDING:

वय फक्त 19, आवाज अतिशय मधुर, मुंबई लोकलमध्ये गाणारी ही तरुणी कोण?, VIDEO

Last Updated:

singer in mumbai local - सानिका कणसे असे या 19 वर्षांच्या मुलीचे नाव आहे. ती कल्याणची रहिवासी आहे. सानिका ही कल्याण मधून दररोज तिच्या कॉलेजच्या प्रवासासाठी 6:54 कल्याण-परळ लोकल पकडते. या लोकलमध्ये तिची ओळख दत्त प्रसादीक भजन मंडळीसोबत झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निकिता तिवारी, प्रतिनिधी
advertisement

मुंबई - मुंबईतील लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. कारण या लोकल ट्रेनमध्ये प्रत्येक दिवशी लाखोच्या संख्येने प्रवाशी प्रवास करतात. या प्रवासामध्ये प्रवाशांच्या अनेक ओळखी होतात, तर कधी गाठीभेटी होतात. अनेकदा भजन मंडळींचे ग्रुप तयार झालेलेसुद्धा याठिकाणी दिसून येतात. तुम्हीही या लोकलमध्ये भजन मंडळींच्या ग्रुपसोबत थांबून भजन ऐकले असेल किंवा तसा व्हिडिओतरी पाहिला असेल. यामध्ये दत्त प्रसादीक भजन मंडळीची विशेष चर्चा होते. याच भजन मंडळीबाबत लोकल18 च्या टीमचा हा विशेष रिपोर्ट.

advertisement

6: 54 ची कल्याण ते परळ या ट्रेनमधील दत्त प्रसादीक भजन मंडळीची विशेष चर्चा होते. याचे कारण म्हणजे दत्त प्रसादीक भजन मंडळी या ग्रुपमध्ये एक मुलगी देखील सामील आहे. सानिका कणसे असे या 19 वर्षांच्या मुलीचे नाव आहे. ती कल्याणची रहिवासी आहे. सानिका ही कल्याण मधून दररोज तिच्या कॉलेजच्या प्रवासासाठी 6:54 कल्याण-परळ लोकल पकडते. या लोकलमध्ये तिची ओळख दत्त प्रसादीक भजन मंडळीसोबत झाली.

advertisement

एक दिवस घाई गडबडीत सानिका लोकलमधील जनरल डब्यात चढली आणि तिने हा भजनाचा ग्रुप पाहिला. या लोकलमध्ये भजन करणारी मंडळी आहे, असे तिला कळले. त्यानंतर पुढे दोन-तीन वेळा सानिका हिने त्यांच्यासोबत राहून भजनाचा ठेका धरला. भजन करणाऱ्यांनी सानिकाला गाताना पाहिल्यावर त्यांनी एक दिवस भजन गाण्याची विनंती केली. सानिकाने भजन गातानाचा व्हिडिओ त्यांच्याच ग्रुपमधील एका सदस्याने काढला आणि हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की सानिकाला सगळीकडून खुप मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली.

advertisement

राज्यात याठिकाणी पडणार गुलाबी थंडी, तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?, VIDEO

19 वर्षांची सानिका ही सध्या घाटकोपरच्या झुंझुनवाला महाविद्यालयात बीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. सानिकाचे बाबा हे बेस्टमध्ये कार्यरत असून आई गृहिणी आहे. सानिकाला भजनाचे बाळकडू तिच्या गावातील मंडळींकडून मिळाले आहे. लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाचा वारसा लाभल्यामुळे जिथे भजन असेल तिथे सानिका भजनासाठी जात असे. त्यामुळे सानिकाला भजनाची आवड निर्माण झाली. ही आवड सानिकाने जोपासली आणि सुंदर भजन गाऊ लागली. भजन आणि शिक्षणासोबतच सानिका ही महाविद्यालयात एनसीसी या विभागात देखील आहे.

advertisement

लोकल18 ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सानिका म्हणाली की, "सध्या तरी भविष्यात कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं असं अजून ठरवलं नाही. मला संगीत क्षेत्रातून काही ऑफर आल्या होत्या. पण माझ्या एनसीसी कॅम्पमुळे त्या ऑफर मी स्वीकारू शकली नाही. पण हा जो काही प्रवास सुरू आहे तो खूप छान सुरू आहे आणि मला याचा फार आनंद होत आहे," या शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

मराठी बातम्या/Viral/
वय फक्त 19, आवाज अतिशय मधुर, मुंबई लोकलमध्ये गाणारी ही तरुणी कोण?, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल