भारतामध्ये कर्मचार्यांच्या पगारविषयक प्रणालीमध्ये मोठा बदल होणार आहे. आता कंपन्या वेतन ठरवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करण्याच्या तयारीत आहेत. पुढील 2 ते 3 वर्षांत कंपन्या AI-बेस्ड प्रेडिक्टर मॉडेल स्वीकारून वेतन ठरवण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यावर भर देणार असल्याचं सांगितलं जात आहे.
EY च्या ‘Future of Pay 2025’ रिपोर्टनुसार, 10 पैकी 6 कंपन्या AI चा वापर वेतन आणि इन्सेंटिव्ह ठरवण्यासाठी करू इच्छितात. फक्त पगारच नाही, तर रिअल-टाइम पे इक्विटी अॅनालिसिस आणि कस्टमाइज्ड बेनिफिट्स ठरवण्यासाठीही कंपन्या AI तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या तयारीत आहेत.
advertisement
याचा काय फायदा होईल?
आता कंपन्या फिक्स्ड सॅलरी स्ट्रक्चर्सच्या ऐवजी AI-बेस्ड पूर्वानुमान आणि रिअल-टाइम वेतन पुनरावलोकन (salary revisions) स्वीकारत आहेत. AI च्या मदतीने पगार अधिक पर्सनलाइज्ड आणि पारदर्शक केले जात आहे. तसेच ब्लॉकचेन आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स वेतन प्रक्रिया सुरक्षित आणि ऑटोमेटेड बनवत आहेत.
EY च्या अहवालानुसार, 2025 मध्ये भारतात सरासरी वेतनवाढ 9.4% असेल. काही प्रमुख क्षेत्रांमध्ये अशी वाढ अपेक्षित आहे:
ई-कॉमर्स: 10.5%
फायनान्शियल सर्व्हिसेस: 10.3 %
ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स: 10.2 %
IT क्षेत्र: 9.6 %
IT-एनेबल्ड सर्व्हिसेस: 9 %
रिपोर्टनुसार, २०२३ मध्ये कर्मचार्यांच्या नोकरी सोडण्याचे प्रमाण (attrition rate) 18.3% होते, तर 2024 मध्ये ते घटून 17.5 % वर आले आहे. याचा अर्थ कंपन्यांच्या नवीन टॅलेंट टिकवण्याच्या रणनीती यशस्वी होत आहेत.
AI सोबतच हायब्रिड वर्क मॉडेल आणि लॉन्ग-टर्म इन्सेंटिव्ह्स यांसारख्या सुविधा कंपन्या देत आहेत, ज्यामुळे कर्मचारी अधिक समाधानी राहतील. यामुळे भारतीय वेतन बाजारात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे आणि यामध्ये AI ची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.