TRENDING:

समुद्रात भयंकर अपघात, विमान थेट पलटीच झालं; व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

Last Updated:

विमान आला आणि पाण्यात थेट पलटीच मारली, हा कोणताही स्टंट नाही, भयानक अपघाताचा व्हिडीओ समोर

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 02 ऑगस्ट : व्हिडीओची सोशल मीडियावर कमी नाही. त्यामुळे तुम्ही सोशल मीडिया नुसतं ओपन जरी केली तरी तुम्हाला फक्त व्हिडीओच पाहायला मिळतील. येथे तुम्ही अनेक मनोरंजक किंवा धक्कादायक व्हिडीओ पाहिले असतील. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ हा फारच धक्कादायक आहे.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

हा व्हिडीओ विमान अपघाताशी संबंधीत आहे. ज्या पद्धतीने या विमानाचा अपघात घडला आहे. हे दृश्य फारच धक्कादायक आहेत.

अमेरिकेतील न्यू हॅम्पशायरमधील हॅम्प्टन बीचवर एक मोठी दुर्घटना घडली. येथे हवेत उडणारे बॅनर विमान अचानक अपघाताचे बळी ठरले. या विमानाची ओळख सिंगल-इंजिन पाईपर पीए-18 अशी करण्यात आली आहे, जे तेथे एका संगीत कार्यक्रमाची जाहिरात करणारे बॅनर टोइंग करत होते.

advertisement

पावसाचं पाणी घरात आणण्यासाठी महिलेचा जुगाड, Viral Video पाहून नक्कीच कराल कौतुक

हवेत उडत असताना अचानक हे विमान समुद्राच्या पृष्ठभागावर आदळले आणि पूर्णपणे उलटले, हे संपूर्ण दृश्य तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, काही लोक समुद्र किनाऱ्यावर मस्ती करत असताना अचानक हवेत उडणारे एक बॅनर विमान समुद्राला धडकले. हे पाहून तेथे उपस्थित लोक मदतीसाठी त्या विमानाच्या दिशेने धावले.

advertisement

विमान समुद्राला इतके जोरदार धडकले की त्याचा पुढचा भाग पाण्यात गेला आणि विमानाचा मागील भाग पूर्णपणे उलटला. तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, त्या विमानाच्या पायलटने प्रथम त्याचे बॅनर टाकले, जेणेकरून काहीतरी गडबड आहे हे कळेल. येथील दृश्य अगदी एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगसारखे असल्याचे लोकांनी सांगितले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, तुरीच्या दरात झाली मोठी वाढ, सोयाबीनला काय मिळाला दर?
सर्व पहा

अपघातग्रस्त विमानात फक्त पायलटच असल्याचे सांगण्यात येत आहे. हॅम्प्टन बीच जीवरक्षकांच्या मदतीने त्या पायलटची सुटका करण्यात आली. पायलटला कोणतीही दुखापत झाली नाही, तो पूर्णपणे बरा आहे. हॅम्प्टन अग्निशमन विभागाचे जीवरक्षक आणि लोक दोरीच्या साहाय्याने अपघातग्रस्त विमानाला पाण्यातून बाहेर काढत असल्याचे दुसऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या अपघातामागील कारणांचा शोध सुरू आहे.

मराठी बातम्या/Viral/
समुद्रात भयंकर अपघात, विमान थेट पलटीच झालं; व्हिडीओ अंगावर काटा आणणारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल