नासाच्या शास्त्रज्ञांच्या नवीन संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की परग्रही संस्कृती आपल्या अंतराळातील सिग्नल सहजपणे ऐकू शकतात, कारण मंगळावरील रोव्हर्स आणि ऑर्बिटर्सद्वारे पाठवलेले काही रेडिओ सिग्नल अवकाशात विखुरलेले असतात. हे सिग्नल अनिश्चित काळासाठी टिकू शकतात आणि जर एखादा परग्रही पृथ्वी-मंगळ संरेखन रेषेवर असेल तर ते उचलले जाऊ शकतात.
अद्भुत! धगधगत्या सूर्याला चिरत गेला रॉकेट, पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झालं असं दृश्य, Watch Video
advertisement
जेव्हा शास्त्रज्ञ मंगळावरील रोव्हर्सना सूचना पाठवतात तेव्हा शक्तिशाली रेडिओ सिग्नल प्रसारित केले जातात. पण मंगळ सर्व सिग्नल ब्लॉक करू शकत नाही. ग्रहाच्या लहान आकारामुळे काही सिग्नल बाहेर पडतात, अंतराळात पसरतात. नासाच्या डीप स्पेस नेटवर्क लॉगच्या विश्लेषणातून असं दिसून आलं आहे की बहुतेक सिग्नल मंगळाच्या दिशेने आणि नंतर सूर्य-पृथ्वी लॅग्रेंज पॉइंट्सकडे जातात. हे ट्रान्समिशन अंतराळयान नियंत्रणासाठी आहेत, पण जर एखादी परग्रही संस्कृती आपल्या सौर मंडळाच्या समतल काठावर असेल, तर हे सिग्नल त्यांच्या रडारद्वारे पकडले जाऊ शकतात. संशोधकांचे म्हणणं आहे की अशा संरेखन 23 प्रकाशवर्षांच्या त्रिज्येतील स्थानांवर केंद्रीत असले पाहिजेत. गेल्या 20 वर्षातील डेटा दर्शवतो की आपल्या प्रसारणाच्या मार्गात परग्रही असण्याची शक्यता 77 टक्के आहे.
हा अभ्यास नासा जेट प्रोपल्शन लॅबच्या सहकार्याने करण्यात आला. सायन्स अलर्टच्या वृत्तानुसार हे संशोधन अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रकाशित झाला आहे. नासाच्या या अभ्यासामुळे पुन्हा एकदा एलियन्स हा चर्चेचा विषय बनला आहे.
या संशोधनातून असं सूचित होतं की परग्रहींच्या शोधांसाठी आपण ग्रहांच्या संरेखन रेषांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, जिथं सिग्नल अधिक मजबूत असतात. ज्याप्रमाणे आपण मंगळावर सिग्नल पाठवतो, त्याचप्रमाणे परग्रही देखील शेजारच्या ग्रहांना सिग्नल पाठवू शकतात. जर परग्रही लोक अंतराळ यानांना सिग्नल पाठवतात, तर आपण त्यांचे स्पिलओव्हर शोधू शकतो. त्यांचे सिग्नल एज-ऑन अलाइनमेंटवर देखील शोधले जाऊ शकतात. जसे ते आपले आवाज ऐकतात तसे आपण त्यांचे संवाद ऐकून आपण त्यांच्या उपस्थितीची पुष्टी करू शकतो. यामुळे परग्रही बुद्धिमत्ता शोधणं सोपं होऊ शकतं. यामुळे SETI प्रकल्पांना एक नवीन दिशा मिळू शकते, यादृच्छिक शोधांपेक्षा लक्ष्यित स्थानांवर लक्ष केंद्रीत केलं जाऊ शकते.