Agni Prime Missile Rail : भारताची ऐतिहासिक झेप! पहिल्यांदाच चालत्या रेल्वेतून सोडलं क्षेपणास्त्र, रेल्वे लाँचरने अग्नी प्राइम मिसाईलचं टेस्टिंग
- Published by:Priya Lad
Last Updated:
Rail Based Agni Prime Missile : भारताने आपल्या संरक्षण क्षमतेत एक नवीन अध्याय जोडला आहे. भारताने रेल्वे-आधारित मोबाइल लाँचर सिस्टमवरून अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
नवी दिल्ली : रेल्वे किंवा ट्रेन, ज्याने लोक प्रवास करतात किंवा माल वाहतूक केली जाते. पण भारताने आता या रेल्वेचा वापर अशा कामासाठी केला आहे, ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल. भारताने पहिल्यांदाचा चालत्या रेल्वेतून क्षेपणास्त्र सोडलं आहे. रेल्वे लाँचरने अग्नी प्राइम मिसाईलचं टेस्टिंग करण्यात आलं आहे. भारताची ही ऐतिहासिक झेप आहे.
आतापर्यंत तुम्ही जमिनीवरून, जहाजातून, विमानातून क्षेपणास्त्र लाँच केल्याचं पाहिलं असेल पण आता भारताने आपल्या संरक्षण क्षमतेत एक नवीन अध्याय जोडला आहे. चक्क रेल्वेतून मिसाईल लाँच करण्यात आलं आहे. भारताने रेल्वे-आधारित मोबाइल लाँचर सिस्टमवरून अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की, "भारताने रेल्वे-आधारित मोबाइल लाँचर सिस्टमवरून मध्यम-श्रेणीच्या अग्नि प्राइम क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. या पुढच्या पिढीतील क्षेपणास्त्राची श्रेणी 2000 किमीपर्यंत आहे आणि ते विविध प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. यामुळे भारत रेल्वे नेटवर्कवरून कॅनिस्टराइज्ड लाँच सिस्टम विकसित करणाऱ्या काही देशांपैकी एक बनला आहे. ही कामगिरी संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अशाप्रकारे, ही चाचणी भारताच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात एक मैलाचा दगड आहे."
advertisement
ही चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO), स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) आणि सशस्त्र दलांच्या पथकाने केली. राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, एसएफसी आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन केलं.
अग्नि प्राइम क्षेपणास्त्र हे अग्नि मालिकेतील एक नवीन पिढीचं क्षेपणास्त्र आहे, जे जुन्या अग्नि-1 आणि अग्नि-2 ची जागा घेण्यासाठी डिझाइन केलेलं आहे. अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे ते 2000 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम असलेले मध्यम-श्रेणीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बनतं. त्यात सुधारित अचूकता, कॅनिस्टराइज्ड कॉन्फिगरेशन आणि जलद ऑपरेशनल तयारी यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे. कॅनिस्टराइज्ड सिस्टममुळे क्षेपणास्त्र दीर्घकाळ साठवता येतं आणि प्रक्षेपणासाठी तयार ठेवता येतं, ज्यामुळे ते रस्त्यावरून फिरणाऱ्या, पाणबुडीतून प्रक्षेपित होणाऱ्या आणि सायलो-आधारित प्रणालींशी सुसंगत बनतं. त्याची उच्च गतिशीलता आणि कमी दृश्यमानता शत्रूसाठी आव्हानात्मक ठरेल.
advertisement
India has carried out the successful launch of Intermediate Range Agni-Prime Missile from a Rail based Mobile launcher system. This next generation missile is designed to cover a range up to 2000 km and is equipped with various advanced features.
The first-of-its-kind launch… pic.twitter.com/00GpGSNOeE
— Rajnath Singh (@rajnathsingh) September 25, 2025
advertisement
रेल्वे-आधारित मोबाईल लाँचरवरून हे क्षेपणास्त्र डागण्याची ही पहिलीच वेळ आहे, जी देशाच्या रेल्वे नेटवर्कमधून मुक्तपणे फिरू शकते. यात रेल्वे नेटवर्कच्या गतिशीलतेवर लक्ष केंद्रीत केलं गेलं, जे युद्धकाळात क्षेपणास्त्राची टिकून राहण्याची क्षमता वाढवते. यामुळे प्रक्षेपण वेळ कमी होतो आणि शत्रूच्या शोधापासून वाचणं सोपं होतं.
advertisement
जागतिक स्तरावर ही एक दुर्मिळ कामगिरी आहे. या चाचणीमुळे भारत रेल्वेवरून कॅनिस्टराइज्ड क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम असलेल्या निवडक देशांच्या गटात समाविष्ट झाला आहे. हे राष्ट्रीय सुरक्षेत क्रांती घडवून आणेल आणि शत्रू राष्ट्रांना इशारा देणारा संकेत म्हणून काम करेल.
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की हे पाकिस्तान आणि चीनसारख्या शेजारील देशांना संकेत देतं, जिथं भारत सीमा तणावाच्या दरम्यान आपली क्षेपणास्त्र क्षमता मजबूत करत आहे. रेल्वे-आधारित प्रक्षेपण अणु प्रतिबंधात गेम-चेंजर ठरतील, कारण ते शत्रूच्या उपग्रह देखरेखीपासून संरक्षण देतात. भारत आता शत्रूंवर ट्रेनमधून क्षेपणास्त्रे डागू शकेल.
Location :
Delhi
First Published :
September 25, 2025 11:26 AM IST
मराठी बातम्या/देश/
Agni Prime Missile Rail : भारताची ऐतिहासिक झेप! पहिल्यांदाच चालत्या रेल्वेतून सोडलं क्षेपणास्त्र, रेल्वे लाँचरने अग्नी प्राइम मिसाईलचं टेस्टिंग