TRENDING:

मुलाला सर्दी खोकला, पालकांनी उपाय म्हणून वापरली अशी गोष्ट, 8 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Last Updated:

अलीकडेच असा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेन्नईत फक्त 8 महिन्यांच्या बाळाला सर्दी-खोकला झाल्याने त्याच्या आई-वडिलांनी घरगुती उपाय केला, पण त्यामुळे बाळाला आणखी त्रास झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : लहान बाळांना सर्दी-खोकला झाला की बहुतांश पालक घरगुती उपाय सुरुवातील करतात. कुणी मोहरीच्या तेलात लसूण टाकून मालिश करतो, तर कुणी वेगवेगळे नुस्खे आजमावतो. प्रत्येक पालक आपल्या ऐकलेल्या-शिकलेल्या उपायांचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की डॉक्टरांचा सल्ला न घेता केलेला एखादा उपाय बाळासाठी जीवघेणा ठरू शकतो?
News18
News18
advertisement

अलीकडेच असा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेन्नईत फक्त 8 महिन्यांच्या बाळाला सर्दी-खोकला झाल्याने त्याच्या आई-वडिलांनी घरगुती उपाय म्हणून वेपोरब आणि कपूर मिसळून छातीवर लावले. हा उपाय जीवावर बेतला आणि काही वेळातच बाळाची तब्येत बिघडली.

डॉक्टरांनी दिली माहिती

पीडियाट्रिशन डॉ. पवन मंडाविया यांनी इन्स्टाग्रामवर टाकलेल्या व्हिडिओत सांगितलं की, वेपोरब आणि कपूर लावल्यानंतर बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचार करूनही त्याला वाचवता आलं नाही.

advertisement

तज्ज्ञ सांगतात की पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, प्रत्येक घरगुती उपाय बाळांसाठी सुरक्षित नसतो. बाजारात मिळणाऱ्या वेपोरबमध्ये कपूर (Camphor), यूकॅलिप्टस ऑइल (Eucalyptus oil) आणि मेंथॉल (Menthol) हे घटक असतात. हे फक्त 2 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठीच वापरण्याची शिफारस केली जाते.

श्वसननलिकेवर होतो परिणाम

कपूर जास्त प्रमाणात वापरल्यास बाळाच्या श्वसननलिकेत इरिटेशन निर्माण होऊ शकते. त्यामुळे श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतो. यामुळे म्यूकस प्रोडक्शन वाढतं आणि कंजेशन आणखी वाढून बाळाला दम लागण्याचा (सफोकेशनचा) धोका निर्माण होतो. गंभीर अवस्थेत हे जीवघेणं ठरू शकतं.

advertisement

2 वर्षांखालील मुलांवर वेपरेब वापरू नका

तज्ज्ञांच्या मते, गंभीर परिस्थितीत कपूर मुलांच्या सेंट्रल नर्व्हस सिस्टीमवर परिणाम करून त्याच्यासाठी धोकादायक बनू शकतो. त्यामुळेच बाजारात मिळणाऱ्या वेपरेबच्या पॅकिंगवर स्पष्ट लिहिलं असतं की ते 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर वापरू नये.

पालकांनी ही बाब लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे की, घरगुती उपाय नेहमीच सुरक्षित नसतात. बाळाच्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
मुलाला सर्दी खोकला, पालकांनी उपाय म्हणून वापरली अशी गोष्ट, 8 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल