भारतातील अनेक राज्यात तुम्हाला मोमोज मिळतीलच. हे स्ट्रीटफूड उकडलेले असल्यामुळे थोडे हेल्दी असते, शिवाय ते टेस्टी देखील लागते. तुम्ही देखील मोमोज अधूमधून खातच असाल. पण आज आम्ही मोमोज संबंधीत अशी एक बातमी समोर घेऊन आलो आहोत, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल आणि कदाचित या नंतर तुम्ही कधीच मोमोज खाणार नाही.
advertisement
मोमोजमुळे तेलंगनातील एका महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे, ज्याने मोमोज लव्हर्सना हादरवून सोडलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे मोमोज खाल्ल्याने अन्य 50 जनांची प्रकृती बिघडली. सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत झालेल्या महिलेला थोडी भूक लागली होती, त्यामुळे काहीतरी हलकंफुलकं खावं म्हणून तिने मोमोज मागवले. परंतू हे मोमोज खाल्यानंतर तिला अचानक त्रास होऊ लगला. त्यानंतर ती धाडकन जमिनीवर आदळली आणि यातच तिचा मृत्यू झाला.
बंजारा हिल्स परिसरात हा फूड स्टॉल लावण्यात आला होता. येथे 31 वर्षीय रेशमा फिरण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे मोमोज खाल्ले होते. महिलेचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली. तसेच पोलिसांनी या परिसरात मोमोज विकणाऱ्या दुकानदाराला ताब्यात घेतलं आहे आणि पुढील तपास करत आहेत.