पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं सौंदर्य
स्काय न्यूजच्या रिपोर्टनुसार, न्यूझीलंडमधील एका पर्यावरण संस्थेने त्याला 'फिश ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित केलं आहे. यावर्षी ब्लॉबफिशला 5 हजारांहून अधिक मतं मिळाली आणि त्याने 1300 हून अधिक मतांच्या फरकाने 'फिश ऑफ द इयर' (Fish of the Year) पुरस्कार जिंकला. ब्लॉबफिशच्या विजयाने हे सिद्ध होतं की सौंदर्य पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं.
advertisement
असा हा विचित्र, पण विशेष मासा
ब्लॉबफिश सुमारे 12 इंच लांब असतो आणि त्याला प्रेमाने मिस्टर ब्लॉबी (Mr. Blobby) असेही म्हणतात. एका वृत्तसंस्थेनुसार, हा मासा अग्ली ॲनिमल प्रोटेक्शन सोसायटीचा (Ugly Animal Protection Society) अधिकृत लोगोसारखा आहे. त्याचा डोके गोलाकार आणि त्वचा ढिली आणि मऊ असते. तो प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाचा दक्षिण-पूर्व किनारा, ऑस्ट्रेलियातील टास्मानिया बेट आणि न्यूझीलंडमध्ये आढळतो.
हे ही वाचा : रक्ताशिवाय जगू शकतात का डास? नर-मादीमध्ये असतो मोठा फरक, सत्य ऐकाल तर थक्क व्हाल!
हे ही वाचा : 80 फ्लॅटचे लाॅक बदलून केला मोठा स्कॅम, महिलेने मिळवले 28 कोटी, पतीला माहीत झालं अन्...