डुअल फ्रीक्वेंसी सिंथेटिक एपर्चर रडार (DFSAR) या रडारने पहिल्यांदाच L-band तंत्रज्ञानाचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागाचे फुल पोलारिमेट्रिक मॅपिंग केलं आहे. याचा अर्थ, चंद्राचा पृष्ठभाग अतिशय तपशीलवार आणि खोलवर स्कॅन केलं गेलं आहे, सुमारे 25 मीटर प्रति पिक्सेलच्या उच्च रिझोल्यूशनमध्ये हे काम झालं आहे.
advertisement
अहमदाबादच्या Space Application Center (SAC) च्या वैज्ञानिकांनी या डेटाचा वापर करून चंद्रावर कुठे बर्फाचं पाणी जमा झालं आहे हे शोधून काढलं आहे. एवढंच नाहीतर पृष्ठभाग किती खडबडीत किंवा गुळगुळीत आहे आणि चंद्राच्या मातीची घनता आणि सच्छिद्रता किती आहे.
वैज्ञानिकांनी सांगितलं की, या सगळ्याचे विश्लेषण करण्यासाठी तयार करण्यात आलेले अल्गोरिदम आणि डेटा प्रोसेसिंग सिस्टीम पूर्णपणे भारतात, ISRO च्या टीमने स्वतः विकसित केली आहे.
ही माहिती आली समोर
चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशांविषयी पहिल्यांदाच इतकी तपशीलवार माहिती मिळाली आहे. चंद्राचे हे भाग आजही सौरमंडळाच्या सुरुवातीच्या रासायनिक परिस्थिती जपून ठेवल्याचं मानलं जातंय. म्हणजेच, ग्रहांची सुरुवात कशी झाली आणि वेळेनुसार त्यांच्यात काय बदल झाले हे समजून घेण्यास हे भाग आपल्याला मदत करू शकतात.
ISRO चे म्हणणं आहे की, हे डेटा प्रोडक्ट्स भविष्यातील चंद्र मोहिमांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरतील. यामुळे वैज्ञानिक हे निश्चित करू शकतील की, चंद्रावर पुढे कुठे लँडिंग करता येईल, कुठे बर्फ किंवा पाण्याचे अंश मिळू शकतात आणि पृष्ठभाग किती मजबूत आहे.
रडारच्या मदतीने काय मिळालं?
या मोज़ेक चित्रांमध्ये अनेक महत्त्वाची पॅरामीटर्स समाविष्ट आहेत, जे चंद्राचा पृष्ठभाग आणि त्याच्या खालील थरांची खरी ओळख सांगतात:
Circular Polarization Ratio (CPR): हे दर्शवते की ज्या ठिकाणी हे मूल्य जास्त आहे, तिथे पाण्याच्या बर्फाची शक्यता असू शकते.
SERD (Single bounce Eigenvalue Relative Difference): हे पॅरामीटर चंद्राच्या पृष्ठभागाची खडबडीतपणा दाखवते.
T-Ratio: यातून मातीची विद्युत क्षमता (dielectric property) कशी आहे हे कळते.
Polarimetric Decomposition: यातून वैज्ञानिक समजू शकतात की, रडारच्या लहरी पृष्ठभागावरून कशा आदळून परत आल्या – सरळ, वाकड्या किंवा अनेक दिशांनी.
सामान्य लोकांसाठी डेटा खुला
ISRO ने आता हा संपूर्ण डेटा Level-3C format मध्ये तयार करून सर्वांसाठी जारी केला आहे. म्हणजेच, आता कोणताही वैज्ञानिक किंवा संशोधक या डेटाचा वापर करू शकतो. हा डेटा भारतीय अंतरिक्ष विज्ञान डेटा केंद्र (ISSDC) च्या PRADAN वेबसाइटवर विनामूल्य उपलब्ध आहे.
