आल्याच्या आवकेत चढ-उतार
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2429 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 1028 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 5600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच रत्नागिरी मार्केटमध्ये आवक झालेल्या 23 क्विंटल आल्यास 6000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
केळीची आवक दबावात
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 231 क्विंटल केळीची आवक राहिली. यापैकी नाशिक बाजारात आवक झालेल्या 210 क्विंटल केळीस 900 ते 2000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 21 क्विंटल केळीस प्रतीनुसार 450 ते 550 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
डाळिंबाची आवक कमी
आज राज्याच्या मार्केटमध्ये 1523 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी नागपूर बाजारात 990 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2000 ते 6000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 389 क्विंटल डाळिंबास 11000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.





