लहान मुलं कधी काय मागतील सांगू शकत नाही. या व्हिडीओतील मुलाने देवासमोर मागणी केली. व्हिडीओत तुम्ही मुलाला पाहू शकता. ज्याने आपल्यासमोर मोबाईल ठेवला आहे. मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आहे. कॅमेऱ्यात पाहत तो देवा काहीतरी चमत्कार कर असं म्हणतो.
नवऱ्याने 3 कोटींसाठी सोडलं; 5 हजाराची नोकरी करून महिलेने तितक्याच किमतीच घर खरेदी केलं
advertisement
यानंतर काय होणार आहे, याची कल्पनाही या मुलाने केली नसेल. हे वाक्य म्हटल्यानंतर त्याला मागे काहीतरी गडबड असल्याचं जाणवतं. तसं तो मागे वळून पाहतो. जसा तो मागे वळतो, तसं समोरून त्याला त्याची आई येताना दिसते. जी खूप रागात असते. त्याची आई रागात धावत येते, मुलाला धरते, ओढते आणि एक थप्पड लगावते. त्यानंतर मोबाईलचा कॅमेरा बंद करते. झालं संपला व्हिडीओ.
देवाला जादू कर म्हणताच देव आईलाचा जादू करण्यासाठी पाठवेल हे मुलाला माहितीही नव्हतं. मुलांनी देवाची प्रार्थना करणं चुकीचं नाही पण मुलगा मोबाईल घेऊन होता याचा राग या आईला आला आणि त्यामुळे तिने तिला मारलं.
व्हिडीओ पाहून मुलाची दयाही येते आणि हसूही येतं. मुलाचा आत्मविश्वास, रील्स बनवण्याची आवड आणि आईचा वेळ लोकांना भावतोय. युझर्स म्हणत आहेत की ही खरी जादू होती, देवाने घडवली होती. बरेच जण म्हणतात की ही प्रत्येक घरातील एक कथा आहे, जिथं मुलं गुपचूप रील्स बनवतात आणि अचानक त्यांच्या आईंनी त्यांना पकडलं. व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक बालपणीच्या आठवणींमध्ये हरवले आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये मजेदार कमेंट्स पोस्ट करत आहेत.
manish_sehrawat05 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेकांनी तो लाईकही केला आहे.
