कॅमेऱ्याने साधलं नेमकं टायमिंग
हा प्रसंग एका मोठ्या क्रिकेट लीगच्या सामन्यादरम्यान घडला. दोन्ही संघांकडून जोरदार खेळ सुरू होता. मात्र, अचानक पाऊस सुरु झाल्याने सामना थांबला पण प्रेक्षकाचा उत्साह तसाच सुरु होता. एकीकडे स्टेडियमध्ये गाणीही सुरु होती. तोच नेमका वेळ साधून एक कपल खाली उतरले अन् त्यांनी भर पावसात डान्स करण्यास सुरुवात केली. मग काय प्रेक्षकाची नजर त्यांच्यावर पडताच ते कपलही अजून आनंदाने डान्स करु लागले. ते दोघे पूर्णपणे मॅचमध्ये गुंग झालेले दिसत होते.
advertisement
प्रेक्षकांचा कल्ला आणि 'लव्ह सिक्सर'
या कपलचा रोमान्स पाहताच संपूर्ण स्टेडियममध्ये एकच कल्ला झाला. प्रेक्षकांनी त्यांचे उत्साहाने कौतुकही केले. अनेकांनी टाळ्या वाजवल्या, शिट्ट्या मारल्या आणि वन्स मोअर अशा घोषणा दिल्या. हा क्षण इतका अनपेक्षित होता की, काही चाहते मैदानावरील खेळ विसरून या कपलच्या डान्सला प्रोत्साहन देऊ लागले.
रोमान्स ठरला खरा 'मॅचचा हायलाईट'
हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत वेगाने व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या कपलचे खूप कौतुक केले आहे. 'मॅचमध्ये चौके-षटकार पडतच राहतील, पण असा गोड रोमान्स क्वचितच पाहायला मिळतो,' अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. काहींनी तर, "आजचा सामना मॅचने नव्हे, तर या कपलच्या लव्ह स्टोरीने जिंकला!" असेही म्हटले आहे.
