कितीतरी कपल आपल्या गरब्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात आणि ते व्हायरल होतात. या कपलचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण त्यांचा गरबा पाहून सगळे संतापले आहेत. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. प्रकरण इतकं वाढलं की जोडप्याला माफी मागावी लागली. नंतर देशच सोडून जावं लागलं. असं या कपलने काय केलं आहे, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही आहे.
advertisement
मॉलमध्ये फिरायला गेलं कपल, पण सुटला कंट्रोल; थेट टॉयलेटमध्ये गेले, 40 मिनिटांनी अशा अवस्थेत बाहेर
व्हिडीओमध्ये हे कपल एकमेकांना किस करताना आणि विचित्र पोझ देताना दिसलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आणि त्यांच्यावर धार्मिक कार्यक्रमाची बदनामी केल्याचा आरोप केला. लोकांनी आक्षेप घेतला आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.परदेशातील हे कपल दोघंही
मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडीओ गुजरातमधील वडोदरातील गरबा शोचा व्हिडीओ आहे. वडोदरातील युनायटेड वे गरबा महोत्सवातील हा प्रकार आहे. 26 सप्टेंबर रोजी हे कपल इथं आलं.
हा Viral Video तुम्हाला हसवेल आणि रडवेलही; असं यात आहे काय, पाहा
कपल भारतीय वंशांचं आहे.. पण गेल्या काही वर्षांपासून ते ऑस्ट्रेलियात राहत आहे, त्यांच्याकडे ऑस्ट्रेलियन नागरिकत्व आहे. माफी मागितल्यानंतर एनआरआय जोडप्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. या जोडप्याचे लग्न झालं आहे, त्यांच्या लग्नाला 16 वर्षे झाली आहेत आणि त्यांना दोन मुलं आहेत. गरब्यातील कृत्याबाबत माफी मागितल्यानंतर या कपलला भारतच सोडावा लागला. ते ऑस्ट्रेलियाला परतले, अशी माहिती आहे.