TRENDING:

पत्नीशी भांडण, नवऱ्याच्या डोक्यात गेला राग, जे केलं त्यामुळे गावकऱ्यांना झाला त्रास, नेमकं काय घडलं?

Last Updated:

पत्नीशी भांडण झाल्यानंतर तरुणाने हा कारनामा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि एसपी सिद्धार्थ तिवारी यांनी परिसरातील वीज बंद करून तरुणाचे प्राण वाचवले. आजूबाजूच्या परिसरात तासनतास वीजपुरवठा खंडित होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अनूप पासवान, प्रतिनिधी
घटनास्थळाचे दृश्य.
घटनास्थळाचे दृश्य.
advertisement

कोरबा : पती पत्नीमध्ये भांडणाच्या घटना तुम्ही याआधी अनेकदा ऐकल्या असतील. मात्र, यातच एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गावामध्ये जी घटना घडली त्या घटनेची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.

छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील कोरबी पोलीस चौकीपासून जवळ ही घटना समोर आली आहे. पोडी खुर्द गावात नशेमध्ये असलेल्या एका तरुणाने 84 फुंट उंच वीजेच्या खांबावर जाऊन चढत ड्रामा केला. तरुणाचा या प्रकारामुळे तब्बल 4 तास वीज वितरण व्यवस्था ठप्प झाली होती. सुमारे 4 तासांच्या अथक परिश्रमानंतर तरुणाला खाली आणण्यात आले. रत राम असे या 26 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

advertisement

अशी वाचला तरुणाचा जीव -

असे सांगितले जात आहे की, पत्नीशी भांडण झाल्यानंतर तरुणाने हा कारनामा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि एसपी सिद्धार्थ तिवारी यांनी परिसरातील वीज बंद करून तरुणाचे प्राण वाचवले. आजूबाजूच्या परिसरात तासनतास वीजपुरवठा खंडित होता. 8000×4000 व्होल्टेजची हाय टेंशन वायर या लाइनवर गेली आहे, असेही सांगितले जात आहे. ही लाईन बंद करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. या घटनेमुळे घटनास्थळी बराच वेळ लोकांची गर्दी झाली होती. यानंतर तरुणाला सुखरूप खाली उतरवण्यात आले. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

advertisement

ram mandir : या सोनारानं बनवली राम मंदिराची अप्रतिम अंगठी, किंमत किती? फोटोही पाहा

आधी पत्नीशी भांडण आणि ...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डिटॉक्स ड्रिंक घेताय? खरंच शरीर साफ होत का? पाहा तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर
सर्व पहा

मिळालेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय रत रामचा त्याच्या पत्नीसोबत वाद झाला. त्यानंतर तो शोले चित्रपटाचा नायक धर्मेंद्र सारखा टॉवरवर चढला. येथून तरुणाने गावकऱ्यांना फोन करण्यास सुरुवात केली. ही बाब गावकऱ्यांना समजली. यानंतर एकामागून एक ग्रामस्थांचा जमाव जमला आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
पत्नीशी भांडण, नवऱ्याच्या डोक्यात गेला राग, जे केलं त्यामुळे गावकऱ्यांना झाला त्रास, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल