एका आर्थिक सल्लागार कंपनीने घटस्फोटाबाबत सर्वेक्षण केलं. घटस्फोटित किंवा घटस्फोटासाठी अर्ज केलेल्यांचं हे सर्वेक्षण. टियर-1 आणि टियर-2 शहरांमधील 1,258 लोकांचा यात समावेश होता. सर्वेक्षणात असं आढळून आलं की घटस्फोटाशी संबंधित खर्चावर 19% महिलांनी आणि 49% टक्के पुरुषांनी 5 लाखांपेक्षा जास्त खर्च केला.
घटस्फोटाचं कारण पैसा
सर्वेक्षणात, 67 टक्के लोकांनी कबूल केलं की त्यांच्या लग्नादरम्यान ते वारंवार पैशांवरून वाद घालत असत. 43 टक्के लोकांनी आर्थिक वाद किंवा असमानता हे त्यांच्या घटस्फोटाचं थेट कारण असल्याचं सांगितलं. लग्नाच्या वेळी 56 टक्के महिला त्यांच्या पतींपेक्षा कमी कमवत होत्या. फक्त 2% महिलांनी त्यांच्या पतींपेक्षा जास्त कमावले.
advertisement
जिवंतपणी हातही लावू दिला नाही, नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायकोने त्याचा मोबाईल घेतला अन् घडलं असं की...
हे सर्वेक्षण करणाऱ्या 'वन फायनान्स अॅडव्हायझरी कंपनी'चे सह-संस्थापक आणि सीईओ केवल भानुशाली म्हणाले की, विवाहित पुरुष आणि महिलांमधील आर्थिक विसंगती घटस्फोटाचं एक प्रमुख कारण आहे. वेगळं होण्याचा खर्च ताण वाढवतो आणि अस्थिरता निर्माण करतो. म्हणून आर्थिक तयारी ही भावनिक तयारीइतकीच महत्त्वाची आहे.
घटस्फोटानंतर पुरुष कर्जबाजारी
घटस्फोट म्हटलं की पोटगी आली. पुरुषांच्या वार्षिक उत्पन्नात पोटगीचा वाटा 38% होता. 29 टक्के पुरुषांना पोटगी दिल्यानंतर त्यांची एकूण संपत्ती नकारात्मक असल्याचं आढळलं. घटस्फोटाशी संबंधित खर्च भागवण्यासाठी 42 टक्के पुरुषांनी लग्नानंतर कर्ज घेतलं, तर 46 टक्के महिलांनी त्यांचं पगाराचं काम सोडलं किंवा कमी केलं.
अजबच आहे राव! 75 वर्षांचे आजोबा, बायकोला सोडून फुग्याच्या प्रेमात, बंद खोलीत रोमान्सही करतात
त्यामुळे सध्याचं कर्ज, भविष्यातील बचत, पालकांच्या जबाबदाऱ्या, उत्पन्नाची अनिश्चितता आणि जीवनशैलीच्या अपेक्षा याबद्दल आधीच माहिती असायला हवी. लग्नापूर्वी आर्थिक बाबींवर मोकळेपणाने चर्चा करावी असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामुळे नातेसंबंधात पारदर्शकता राहते आणि भविष्यातील संघर्ष टाळता येतात.