अजबच आहे राव! 75 वर्षांचे आजोबा, बायकोला सोडून फुग्याच्या प्रेमात, बंद खोलीत रोमान्सही करतात

Last Updated:

Man love balloons : 75 वर्षीय व्यक्ती कोणत्याही महिलेवर नाही तर फुग्यांवर प्रेम करते. अलिकडेच त्याने एका शोमध्ये त्याच्या विचित्र प्रेमाबाबत सांगितलं. त्याचं फुग्यांबद्दल प्रेम तेव्हापासून सुरू झालं जेव्हा तो फक्त चार वर्षांचा होता.

News18
News18
नवी दिल्ली : फुगे कुणाला आवडत नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना फुगे आवडतात. पण फुगे आवडतात, फुग्यांवर प्रेम म्हणून फुग्यांसोबत कुणी रोमान्स केल्याचं कधी ऐकलं आहे का? फुग्यांवर असं प्रेम करणारी व्यक्ती चर्चेत आली आहे. 75 वर्षांची ही व्यक्ती जिचं लग्न झालं आहे, त्याची बायकोही त्याच्यासोबत आहे तरी तो फुग्यांसोबत रिलेशनमध्ये आहे. हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे पाहुयात.
ज्युलियस असं या व्यक्तीचं नाव आहे. अमेरिकेतील टेक्सास इथं राहणारा 75 वर्षीय ज्युलियस कोणत्याही महिलेवर नाही तर फुग्यांवर प्रेम करतो. अलिकडेच, ज्युलियसने टीएलसीच्या माय स्ट्रेंज अॅडिक्शन शोमध्ये त्याच्या अनोख्या प्रेमाबाबत सांगितलं.
ज्युलियसला फुग्यांबद्दल प्रेम तेव्हापासून सुरू झालं जेव्हा तो फक्त चार वर्षांचा होता. एकदा तो रुग्णालयात असताना त्याच्या आईने त्याला एक निळा फुगा दिला. पण रात्रीच्या वेळी एका नर्सने तो फोडला. ज्युलियस इतका रडला की तो त्या रात्री रडतच झोपला. तेव्हापासून फुगा फुटल्याचा आवाज त्याला अस्वस्थ करतो.
advertisement
ज्या लोकांना फुग्यांबद्दल लैंगिक आकर्षण असते त्यांना लूनर म्हणतात. ज्युलियसच्या मते, लूनर ग्रुपमध्ये दोन प्रकारचे लोक असतात. असे लोक आहेत जे फुगे फोडण्यास उत्सुक असतात आणि असे लोक आहेत जे तसं करत नाहीत. तो म्हणाला. "मी फुगे फोडणारा नाही. म्हणून जर मी कोणी फुगे फोडताना पाहिलं तर मी त्यांना वाचवू लागतो. मला असं वाटतं की मी त्यांना आयुष्यात दुसरी संधी देत ​​आहे."
advertisement
आजोबांचा फुग्यांसोबत रोमान्स
तो म्हणाला, "मला माहीत आहे की फुगे जिवंत नसतात, पण कधीकधी मला असं वाटतं की त्यांच्यावरील माझं प्रेम त्यांना जीवन देतं. जेव्हा मी एक सुंदर फुगा पाहतो तेव्हा माझं हृदय धडधडू लागतं आणि मी उत्साहित होतो. तुम्हाला ज्या स्त्रीवर प्रेम आहे तिला मिठी मारणे आणि चुंबन घेणे तुम्हाला आवडत नाही का? फुगे धरणं, मिठी मारणं आणि चुंबन घेणं हे स्वर्गात असल्यासारखं आहे."  ज्युलियसने फुग्यांचं सुंदर, मऊ, गुळगुळीत आणि नाजूक असं वर्णन केलं.  ज्युलियसचे आवडते फुगे क्रिस्टल क्लिअर फुगे. ज्यांची तुलना तो गोऱ्या महिलांशी त्याला लांब, गोल आणि विशेषतः गोलाकार फुगे देखील आवडतात.
advertisement
ज्युलियसला फुग्यांचं इतकं व्यसन आहे की त्याने त्याच्या घरातील एक संपूर्ण खोली त्यांना समर्पित केली आहे. तो या खोलीला त्याचं बलून अभयारण्य म्हणतो आणि दररोज रात्री शेकडो फुग्यांसह झोपतो. त्याने सांगितलं, त्याच्या घरात 50000 हून अधिक फुगे आहेत आणि प्रत्येकाशी त्याचा एक विशेष संबंध आहे. ज्युलियसने गेल्या 50 वर्षांत 50000 हून अधिक फुग्यांशी संबंध असल्याचं उघड केले.
advertisement
 नवऱ्याचं फुग्यांसोबत रिलेशन, बायकोला काय वाटतं?
मनोरंजक म्हणजे ज्युलियस ज्याला फुगे आवडतात, तो वास्तविक जीवनात विवाहित आहे, त्याची पत्नी आहे. पण तिचाही यावर आक्षेप नाही. त्याच्या पत्नीला त्याचं व्यसन विचित्र वाटतं, पण ती ते स्वीकारते. तो म्हणाला की त्याची पत्नी फुग्यांवरील त्याच्या प्रेमाचा मत्सर करत नाही आणि ते त्यांच्या लग्नाला धोका निर्माण करतं, असं तिला वाटत नाही. ज्युलियस म्हणाला, "फुग्यांवर प्रेम करण्यात काहीही चूक नाही. ते धोकादायक नाही आणि ते कोणालाही दुखवत नाही."
मराठी बातम्या/Viral/
अजबच आहे राव! 75 वर्षांचे आजोबा, बायकोला सोडून फुग्याच्या प्रेमात, बंद खोलीत रोमान्सही करतात
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement