बोंबला! गर्लफ्रेंडला प्रपोज करणं महागात, बॉयफ्रेंडला पोलिसांनी केली अटक, पण का?

Last Updated:

Boyfriend arrested propose girlfriend : एका बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं पण पोलिसांनी त्याला अटक केलं. आता यामुळे तुम्हालाही प्रश्न पडला असेल की प्रपोज करणं हा गुन्हा आहे? पोलिसांनी त्याला का अटक केली?

News18
News18
नवी दिल्ली : प्रेम आणि प्रेमाच्या अनेक स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होतात, कधीकधी आश्चर्यकारक असतात. अशीच एक लव्ह स्टोरी जी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. ज्यात एका बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं पण पोलिसांनी त्याला अटक केलं. आता यामुळे तुम्हालाही प्रश्न पडला असेल की प्रपोज करणं हा गुन्हा आहे? पोलिसांनी त्याला का अटक केली?
तैवानमधील हे प्रकरण आहे.  8 जून 2025 रोजी घडलेली ही घटना. मध्यरात्रीच्या सुमारास सोंगशान जिल्ह्यात हुआंग नावाचा 29 वर्षीय तरुण त्याच्या मैत्रिणीसह एका नूडल शॉपवर पोहोचला. हुआंगने त्याची मर्सिडीज-बेंझ कार रस्त्याच्या कडेला पार्क केली होती, ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली. एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस अधिकारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी हुआंगला चुकीच्या पद्धतीने कार पार्क करण्याबद्दल विचारलं तेव्हा त्याचे वर्तन थोडं विचित्र वाटलं. त्याच्या घाबरलेल्या स्वभावाने अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी कारची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
जेव्हा अधिकाऱ्यांनी गाडीची ट्रंक उघडली तेव्हा आत त्यांना एक मोठा बॅनर सापडला ज्यावर माझ्याशी लग्न कर, असं लिहिलं होतं, जो हुआंगच्या त्याच्या प्रेयसीला प्रपोज करण्याच्या प्लॅनचा पुरावा होता. त्यानंतर त्यांनी गाडीचा दरवाजा उघडताच ते थक्क झाले. गाडीच्या आत त्यांना सेंट्रल आर्मरेस्टमध्ये एक स्ट्रॉ मिळाला ज्यावर पांढऱ्या रंगाची पावडर होती, कदाचित ते ड्रग्ज होतं. यामुळे हे प्रकरण पार्किंग उल्लंघनापेक्षा खूपच गंभीर बनलं.
advertisement
अधिकाऱ्यांनी हुआंगला याबाबत विचारलं तेव्हा त्याने सहकार्य करण्यास नकार दिला आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. पोलिसांनी त्वरित कारवाई केली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने अमली पदार्थ केटामाइन घेतल्याचं कबूल केलं. नंतर पोलिसांनी त्याचा गुन्हेगारी इतिहास पडताळला, ज्यामध्ये ड्रग्जच्या गैरवापराचा आणि गुन्ह्याचा दीर्घ इतिहास उघड झाला. कारमधून जप्त केलेले पुरावे तैवानच्या अंमली पदार्थ धोका प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पुढील कायदेशीर कारवाईसाठी पाठवण्यात आले.
advertisement
या दृश्याने उपस्थित असलेल्या सर्वांना विशेषतः त्याच्या प्रेयसीला धक्का बसला. हुआंग दुहेरी जीवन जगत असल्याचं स्पष्ट झाले. एकीकडे,तो त्याच्या प्रेयसीसोबत आयुष्यात पुढे जाण्याचे स्वप्न पाहत होता, तर दुसरीकडे तो गंभीर गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेला होता.
view comments
मराठी बातम्या/Viral/
बोंबला! गर्लफ्रेंडला प्रपोज करणं महागात, बॉयफ्रेंडला पोलिसांनी केली अटक, पण का?
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement