रनिंग म्हणजे धावणं शरीरासाठी चांगलं म्हणतात. पण हेच धावणं घटस्फोटाचं कारण ठरलं आहे. नवरा धावतो म्हणून बायकोने त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
चीनच्या हुनान प्रांतातील ही घटना आहे. झाओ असं या महिलेचं नाव. तिचा नवरा पेंगला रनिंगची खूप हौस होती. पण त्याच्या या सवयीला ती वैतागली होती.
झाओनं सांगितलं की सुरुवातीला तिनंच पेंगला रनिंगासाठी प्रोत्साहीत केलं होतं. जेणेकरून तो फिट, हेल्दी राहिल. पण तो यालाच आपली प्रायोरिटी बनवेल याचा तिने विचारही केला नव्हता. आता त्याच्यासाठी रनिंगच सर्वकाही आहे. यामुळे तिचं नातं उद्ध्वस्त झालं आहे.
आतापर्यंत तर तिनं याकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा रनिंगसाठी त्याने आपल्या 5 वर्षांच्या मुलीसोबत जे केलं त्यानंतर मात्र ती संतप्त झाली. तिचा संयम सुटला आणि तिनं घटस्फोटाचा निर्णय घेतला.
एक दिवस तो आपल्या 5 वर्षांच्या मुलीला कारमध्ये बंद करून रनिंग करायला गेला. त्याने तिला खायला आणि मोबाईलही दिला होता. मुलगी कित्येक तास कारमध्येच बंद होती. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)