व्हायरल होत असलेला हा गोंडस चिमुकला दुसरा तिसरा कोणी नसून एलोन मस्क आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचं नाव येतं. लहानपणी ते फारच गोंडस होते आणि त्यांनी त्यांच्या लहानपणीचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
advertisement
एलोन मस्कने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर त्यांचा हा फोटो शेअर केला. काहीच वेळात त्यांचा हा फोटो इंटरनेटवर खळबळ माजवताना दिसला. फोटोमध्ये ते आईस्क्रिम खाताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर भरपूर लाईक्स आणि कमेंट येताना पहायला मिळत आहेत. त्यांनी ही पोस्ट 3 ऑक्टोबर रोजी शेअर केली मात्र आजपर्यंत पोस्टची चर्चा होत असून कमेंटचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, एलोन मस्क यांच्या पोस्टने खळबळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांची प्रत्येक पोस्ट चर्चेत असते. एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून हेडलाईन्स बनत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून एलॉन मस्क कायमच चर्चेत असतात.