TRENDING:

भर लग्नात नवऱ्याने दोन्ही हातांनी केली विचित्र कृती, नवरीला आला राग, रिकाम्या हाताने परत गेली वरात!

Last Updated:

नालंदा जिल्ह्यातील भूई गावात 7 मे रोजी एक नाट्यमय विवाहप्रसंग घडला. वधूच्या घरी पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा सुरू होता. पण वराने मांडवातच दोन्ही हातांनी...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
म्हणतात ना, जोड्या स्वर्गात बनतात. माणूस कितीही प्रयत्न करो, ज्यांची जोडी देवाने ठरवली आहे, त्याचंच लग्न होतं. कधीकधी असंही पाहायला मिळतं की, नवरदेव मंडपात उभा असतो आणि तरीही वरात रिकाम्या हाताने परत जाते. आज आम्ही तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहोत, जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. खरं तर ही घटना नालंदा जिल्ह्यातील भुई गावाची आहे. जिथे 7 मे रोजी एका मुलीचं लग्न पारंपरिक पद्धतीने होणार होतं.
Nalanda wedding viral
Nalanda wedding viral
advertisement

म्हणतात ना, जोड्या स्वर्गात बनतात. माणूस कितीही प्रयत्न करो, ज्यांची जोडी देवाने ठरवली आहे, त्याचंच लग्न होतं. कधीकधी असंही पाहायला मिळतं की, नवरदेव मंडपात उभा असतो आणि तरीही वरात रिकाम्या हाताने परत जाते. आज आम्ही तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहोत, जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. खरं तर ही घटना नालंदा जिल्ह्यातील भुई गावाची आहे. जिथे 7 मे रोजी एका मुलीचं लग्न पारंपरिक पद्धतीने होणार होतं.

advertisement

नवऱ्याची कृती पाहून नवरीला बसला धक्का

घरात सनई वाजत होती, संपूर्ण गाव आनंदात नाचत होतं. घरातील महिला गाणं गात होत्या आणि वडील आपल्या मुलीची स्वप्ने पूर्ण होताना पाहून खूप आनंदी होते. पण, इथेच गोष्टीत ट्विस्ट आला आणि आनंदाचे रंग दुःखात बदलले, सनईचे सूर फिके पडू लागले आणि सोहळा एका आपत्तीत बदलला.

advertisement

झाले असे की, 7 मे रोजी जिल्ह्यातल्या नूरसराय येथून आलेली वरात नवरीविनाच रिकाम्या हाताने परतली. घडलं असं की, जयमाला झाल्यानंतर नवरी-नवरदेवाला मिठाई खायला दिली गेली, पण इथे नवरदेवाची कृती पाहून नवरी आणि तिच्या घरच्यांना मोठा धक्का बसला. नवरदेवाने व्यवस्थित मिठाई खाण्याऐवजी दोन्ही हातांनी रसगुल्ले खायला सुरुवात केली.

तिथे उपस्थित असलेले गावकरी आणि कुटुंबीयांना नवरदेवाच्या मानसिक स्थितीबद्दल शंका आली आणि मुलाचं गुपित उघड झालं. यानंतर, एकामागोमाग एक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. नवरी आणि तिच्या घरच्यांनी नवरदेवाकडील मंडळींवर आरोप करण्यास सुरुवात केली. नवरीच्या वडिलांच्या मते, लग्न ठरवताना मुलाकडच्यांनी त्याच्या मानसिक स्थितीबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल त्यांना थोडीही माहिती दिली नव्हती.

advertisement

नवरदेवाची अवस्था पाहून नवरीने लग्नाला नकार दिला

मुलाच्या घरच्यांनी मुलीच्या घरच्यांना सांगितलं होतं की, मुलगा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे ठीक आहे. यानंतर लग्नाची तारीख ठरली आणि दोन्ही कुटुंबीये आनंदी होते. ठरलेल्या तारखेला वरातही आली, पण नशिबाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. यानंतर मुलाकडील लोकांनी त्यांना अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण मुलीकडील मंडळी आणि खुद्द नवरीनेही लग्नास नकार दिला.

advertisement

त्यामुळे गर्दीसमोर वरातीतल्या लोकांना रिकाम्या हाताने परतावं लागलं. मात्र, भीतीने कुटुंबीय कॅमेऱ्यासमोर काहीही बोलणं टाळत आहेत. पण, कॅमेऱ्यामागे ते सांगत आहेत की, मुलीचं सुख पूर्ण होऊ शकलं नाही. वडिलांची मेहनत आणि आशा वाया गेली. कदाचित नशिबाला काहीतरी वेगळंच हवं आहे. दुसरीकडे, या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरू असून, चौकाचौकात लोक याबद्दल बोलत आहेत.

हे ही वाचा : Chanakya Niti : चाणक्यनीतीत सांगितलेत मिठी मारण्याचे फायदे

हे ही वाचा : लग्नच करायचं नाही म्हणताय? लग्नाशिवाय कसं आहे आयुष्य? वाढत्या वयातील सिंगल महिलांनी सांगितलं

मराठी बातम्या/Viral/
भर लग्नात नवऱ्याने दोन्ही हातांनी केली विचित्र कृती, नवरीला आला राग, रिकाम्या हाताने परत गेली वरात!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल