TRENDING:

कापलेल्या नखांपासून मिळतो पैसा, लोक विकत आहे, असा वापर तुम्ही विचारही केला नसेल

Last Updated:

People selling Nails use : कापलेली नखंही विकली जातात हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. नखं कापली की तुम्ही काय करता, साहजिकत फेकून देता. पण तुम्ही कधी विचार केला आहे का ही कापलेली नखं तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीजिंग : आपले तुटलेले केस विकत घेतले जातात याबाबत तुम्हाला माहिती असेल. या केसांपासून हेअर विग तयार केल्या जातात. पण कापलेली नखंही विकली जातात हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. नखं कापली की तुम्ही काय करता, साहजिकत फेकून देता. पण तुम्ही कधी विचार केला आहे का ही कापलेली नखं तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकतात. आता हे कसं काय? या नखांचं नेमकं काय केलं जातं? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
News18
News18
advertisement

अलीकडेच एका चिनी मीडिया रिपोर्टमध्ये असं वृत्त आलं आहे की हेबेई प्रांतातील एक महिला लहानपणापासून गोळा केलेली नखं विकत होती. तिने ती 150 युआन म्हणजे अंदाजे 1,750 रुपये प्रति किलोग्रॅमला ऑनलाइन विकली. कचरा मानल्या जाणाऱ्या गोष्टी इतरत्र मौल्यवान बनू शकतात हे ऐकून लोक आश्चर्यचकित झाले.

बाबो! फक्त बाळाचं नाव सुचवण्यासाठी घेते 26 लाख, पालकही तिच्याकडे येतात, इतकं त्या नावात काय खास?

advertisement

1960 च्या दशकापर्यंत नखांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. पण हळूहळू जेव्हा लोकांनी नेलपॉलिश लावायला सुरुवात केली, तेव्हा नखांची गुणवत्ता खालावली, ज्यामुळे त्यांचा वापर कमी झाला. पण कालांतराने पर्याय उदयास आले. आता त्यांची मागणी पुन्हा वाढत आहे.

आता याचा उपयोग काय. तर ही नखं पारंपारिक चिनी औषधांचा भाग मानली जातात. पारंपारिक चिनी औषधांमध्ये नखं विविध आजारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त असल्याची मानली जातात. उदाहरणार्थ, मुलांमध्ये पोट फुगणं आणि टॉन्सिलाईटिससारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी नखांची पावडर वापरली जाते.

advertisement

10,00,00,000 रुपयांची सर्जरी! रुग्ण नाही हॉस्पिटल रुग्णाला देणार इतके पैसे, पण का?

म्हणून चीनमधील औषध कंपन्या शाळा आणि गावांमधून नखं खरेदी करतात. कंपन्या प्रथम खरेदी केलेली नखं पूर्णपणे धुतात. नंतर ती वाळवले जातात आणि बारीक केली जातात. नंतर ही पावडर विविध औषधं आणि फॉर्म्युलेशनमध्ये मिसळली जाते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बंद होणार होती ZP शाळा, आज ठरली जगातली नंबर वन School, पाहावी अशी स्टोरी! Video
सर्व पहा

पण एक समस्या अशी आहे की मानवी नखं खूप हळूहळू वाढतात. प्रौढ व्यक्तीची नखं दरवर्षी फक्त 100 ग्रॅम वाढतात. यामुळे मोठ्या प्रमाणात नखं गोळा करणं कठीण आणि महाग होतं. जर तुम्ही विचार करत असाल की पायाची नखे देखील विकली जाऊ शकतात, तर हे अजिबात नाही. कंपन्या विशेषतः हे स्पष्ट करतात की ते फक्त नखं खरेदी करतात, पायाची नखं खरेदी करत नाहीत.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
कापलेल्या नखांपासून मिळतो पैसा, लोक विकत आहे, असा वापर तुम्ही विचारही केला नसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल