महिलेनं आपला नवरा आणि मुलांना सांगितलं की, ती काही कामानिमित्त बाहेर जात आहे. प्रत्यक्षात ती तिच्या प्रियकरासोबत वेळ घालवण्यासाठी हॉटेलमध्ये गेली होती. दुसरीकडे नवऱ्याला थोडा संशय आला आणि तो थेट आपल्या मुलांना घेऊन त्या हॉटेलमध्ये पोहोचला. चौकशीनंतर त्याला बायकोचा हॉटेलमधील रूम नंबर समजला आणि तो थेट तिथे पोहोचला.
दरवाजा उघडताच नवऱ्याच्या डोळ्यांसमोर जो काही प्रकार आला, तो पाहून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. पत्नी आपल्या प्रियकरासोबत आपत्तिजनक स्थितीत होती. अखेर संतप्त नवऱ्यानं रूममध्ये गोंधळ घातला आणि वाद सुरू झाला.
advertisement
झाल्या प्रकारानं महिला इतकी घाबरली की तिनं कोणतीही शुद्ध न ठेवता केवळ पेटीकोट आणि ब्लाऊजमध्येच तिने थेट हॉटेलच्या बाल्कनीतून उडी मारली आणि शेजारच्या घराच्या गच्चीत पोहोचली. तिथून तिनं अरुंद भिंतीवरून चालत खाली रस्त्यावर उडी मारली आणि पळून गेली. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ कोणी तरी शूट केला, जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी स्पष्ट केलं की, अद्याप यासंदर्भात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र व्हिडिओच्या आधारे तपास सुरू आहे.
या घटनेवर सोशल मीडियावर अनेकांनी मजेशीर आणि थेट प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी म्हटलं, "प्रूफ मिळाला बरं झालं, नाहीतर हीच उलट तक्रार केली असती." तर दुसऱ्यानं लिहिलं, "भाऊ, थोडं शांत रहा, आता ती बदला घेईल." तिसऱ्यानं कमेंट केली, "वाह! पोलिसांपेक्षा पण वेगवान आहे ही."