TRENDING:

Taj Mahal : ताज महालाचे सुंदर दृश्य दिसते, त्या जागेवर शेतकऱ्याने ठोकला दावा; तिथे पर्यटकांना प्रवेशबंदी

Last Updated:

मुन्‍नालाल नावाच्या शेतकऱ्याने ताजमहालजवळील अकरा पायऱ्यांच्या पार्कमधील जमिनीवर आपला हक्क असल्याचा दावा केला आहे. या जमिनीवर प्रवेश बंदी घालण्यात आली असून, आग्रा विकास प्राधिकरण चौकशी करत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ताजमहालजवळील अकरा पायऱ्यांच्या पार्कवर वाद निर्माण झाला आहे. या परिसरातील एका शेतकऱ्याने या पार्कमधील काही भाग आपला असल्याचा दावा केला आहे. या शेतकऱ्याचा म्हणणे आहे की, ही जमीन त्याच्या वडिलोपार्जित मालकीची आहे आणि अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर न्यायालयाने त्याच्या बाजूने निर्णय दिला आहे. यमुनाकाठावर बांधलेल्या या पार्कमध्ये ताजमहालच्या सूर्यास्ताचे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.
News18
News18
advertisement

40 वर्षांचा संघर्ष : टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार कच्छपूरा येथील रहिवासी असलेल्या मुन्‍नालाल या शेतकऱ्याने या पार्कमधील छे बीघा जमीन जिंकण्यासाठी तब्बल 40 वर्षे न्यायालयीन संघर्ष केला. मुन्‍नालाल यांनी ट्रॅक्‍टरने या जमिनीची नांगरणी केली आहे आणि तिच्या बाजूने वायरचे कुंपणही केले आहे. याशिवाय, त्यांनी या भागात सामान्य लोकांना प्रवेश बंदी घातली आहे.

advertisement

आता होणार चौकशी : आग्रा विभागीय आयुक्त ऋतु महेश्वरी यांनी सांगितले की, ही जमीन आग्रा विकास प्राधिकरणाच्या (एडीए) अखत्यारीत येते. त्या म्हणाल्या की, "संपूर्ण प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. एडीए या पार्कचे देखभाल करते. मेहताब बागेजवळ असलेला हा ऐतिहासिक पार्क एडीएने मनोरंजन आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा उद्देश ठेवला आहे."

advertisement

मुघल सम्राट हुमायूँशी खास संबंध : 2023 मध्ये या पार्कमध्ये ताज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय 1997 मध्ये ग्रीक संगीतकार यानी यांचा मैफिलही येथे झाली होती. मुघल सम्राट हुमायूँ यांनी या पार्कचा वापर वेधशाळा म्हणून केला होता. टुरिस्ट गाईड फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव शकील चौहान म्हणाले, "सूर्यास्ताच्या वेळी ताजमहाल पाहण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी होते. मात्र या नव्या घटनेने आता अनेक प्रश्न निर्माण केले आहेत."

advertisement

जमिनीच्या वादाचा काय आहे इतिहास?

शेतकरी मुन्‍ना लाल यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांनी आणि काकांनी या जमिनीवर शेती केली होती. या जमिनीच्या कागदपत्रांवर त्यांचे नावही आहे. मात्र 1976 च्या जमीन अधिग्रहणामुळे ही जमीन त्यांच्या ताब्यातून गेली. 1998 आणि 2020 च्या जिल्हा न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, या जमिनीचे मालकी हक्क मुन्‍ना लाल यांच्याच नावावर आहेत. मुन्‍ना लाल म्हणाले, "आमच्या कुटुंबाने ही जमीन वाचवण्यासाठी 40 वर्षे न्यायालयीन लढाई लढली आहे. आमच्याकडे न्यायालयाचे आदेश आणि कायदेशीर कागदपत्रे आहेत. 2020 मध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने आमच्या मालकीची पुष्टी केली, जी महसूल नोंदवहीत देखील नमूद आहे."

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Taj Mahal : ताज महालाचे सुंदर दृश्य दिसते, त्या जागेवर शेतकऱ्याने ठोकला दावा; तिथे पर्यटकांना प्रवेशबंदी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल