अयोध्या : सध्या अयोध्येमध्ये एक पोलीस ठाणे खूप चर्चेत आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि एका माकडाच्या मैत्रीमुळे हे पोलीस ठाणे चर्चेत आले आहे. पोलीस ठाण्याचे एसएचओ देवेंद्र पांडेय यांच्याजवळ दररोज एक माकड येते आणि त्यांच्या मांडीवर बसते, तर कधी खांद्यावर बसते. केसांनाही हात लावते. तसेच काही वेळा काही खाण्या-पिण्यासाठी इशाराही करते. मागील 4-5 महिन्यांपासून सातत्याने हे माकड याठिकाणी येत आहे. विशेष म्हणजे या माकडाची एक विशेषत: अशी आहे की, जेव्हा हे माकड काही खाते, तेव्हा देवेंद्र पांडे यांनाही खाऊ घालते.
advertisement
एसएचओ देवेंद्र पांडेय यांनी या माकडाचे नामकरणही केले आहे. ते या माकडाला कधी बजरंगी तर कधी सुशीला या नावाने ओळखतात. त्याला नावाने हाक मारल्यावर ते माकड जवळ येते. देवेंद्र पांडे यांनी सांगितले की, जेव्हापासून माझी नियुक्ती याठिकाणी झाली आहे, तेव्हापासून हे माकड माझ्याजवळ नियमित येते. मी नेहमी हनुमानजी यांची पूजा करतो. पंचमुखी हनुमान यांच्यावर माझी आस्था आहे. माझ्यावर असलेल्या हनुमानजी यांच्या कृपेमुळेच वानरराज माझ्याजवळ येतात.
देवेंद्र पांडेय पुढे म्हणाले, आम्ही त्याचे नाव सुशिला असे ठेवले आहे. नावाने हाक मारल्यावर तो परत येतो. हनुमान जी अयोध्येचे राजा आहेत आणि कुठेतरी हनुमानजी यांची कृपा माझ्यावर आहे. मी स्वत:ला खूप भाग्यशाली मानतो. जर मी भाग्यशाली नसतो तर प्रतिष्ठापनाच्या औचित्यावर मी याठिकाणी राहिलो नसतो. हनुमानजी यांनी मला अयोध्येत सेवा करण्याची संधी दिली आणि ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.
मुलांची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर सिक्रेट टिप्स करा फॉलो, आठवड्याभरातच दिसेल फायदा
काय आहे धार्मिक मान्यता
धार्मिक मान्यता अशी आहे की, माकडाला हनुमानाचे रुप मानले जाते. राम मंदिरासोबत माकडाचे अनोखे नाते आहे. भगवान रामललाच्या भव्य मंदिरात विराजमान झाल्यावर रामललाच्या दर्शनासाठी माकड गर्भगृहापर्यंत गेले होते. याची माहिती राम मंदिर ट्रस्टनेही दिली होती. असे मानले जाते की, भगवान राम जेव्हा लंकेवर विजय मिळवल्यावर अयोध्येला परतले तेव्हा वानरसेनाही त्यांच्यासोबत अयोध्येला आली होती.