मुलांची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर सिक्रेट टिप्स करा फॉलो, आठवड्याभरातच दिसेल फायदा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
स्मरणशक्ती कमजोर होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मुले जेवताना हातात स्मार्टफोन ठेवतात. यामुळे तुम्ही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करून काम करत नाही, म्हणून तुमचे लक्ष विचलित होते आणि तुम्हाला गोष्टी नीट आठवत नाहीत.
शिखा श्रेया, प्रतिनिधी
रांची : मुलांची स्मरणशक्ती हीसुद्धा आज काळात एक मोठी समस्या बनत चालली आहे. लहान लहान गोष्टी विसरणे, हीबाब आता अनेकदा दिसून येत आहे. मात्र, विसरण्याची ही सवय मोठमोठ्या समस्यांचे कारणही बनते. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या दिनचर्येमध्ये काही गोष्टींचा समावेश केला तर तुम्ही या विसरण्याच्या समस्येपासून सुटका करुन घेऊन शकता आणि विशेष म्हणजे फक्त एका आठवड्यात तुम्हाला हा फरक दिसू लागेल.
advertisement
झारखंडची राजधानी रांची येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर व्ही. के. पांडे यांच्याशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला. डॉ. व्ही. के. पांडे यांनी विनोबा भावे विद्यापीठातून बीएएमएसची पदवी घेतली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, स्मरणशक्ती कमजोर होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मुले जेवताना हातात स्मार्टफोन ठेवतात. यामुळे तुम्ही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करून काम करत नाही, म्हणून तुमचे लक्ष विचलित होते आणि तुम्हाला गोष्टी नीट आठवत नाहीत.
advertisement
या गोष्टींची काळजी घ्याल तर होईल फायदा -
• डॉ. व्ही. के. पांडे यांनी सांगितले की, सर्वात आधी जेवताना, फक्त अन्नावर लक्ष केंद्रित करा. स्मार्टफोन दूर ठेवा आणि प्रत्येक घास काळजीपूर्वक खा. त्याचप्रमाणे चालताना फोनवर बोलू नका. फक्त चालण्यावर लक्ष केंद्रित करा. अशाप्रकारे तुमची छोटी कामे पूर्ण लक्ष देऊन करण्याचा प्रयत्न करा. काही दिवसातच तुम्हाला बऱ्यापैकी फरक झालेला दिसेल.
advertisement
• कमीत कमी 6 ते 7 बदाम रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी सोलून खा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पेस्ट बनवून बदामदूधही बनवून पिऊ शकतात. त्यात एक चमचा मध घाला. आठवडाभरात तुम्हाला त्याचे फायदे दिसून येतील.
• याशिवाय स्मरणशक्ती सुधारण्यासाठी बदामाचे तेलही खूप फायदेशीर आहे. या तेलाने डोक्याला मसाज करा. यामुळे तुमच्या डोक्याला आराम मिळेल. तसेच हे तेल तुम्ही दुधात दोन-तीन थेंब टाकून पिऊ शकता.
advertisement
• दररोज किमान अर्धा तास व्यायामासाठी काढा. तुम्ही सूर्यनमस्कार करा किंवा, योगा करत असाल किंवा वेगाने चालत जा. सूर्याची पहिली किरणे अंगावर पडू द्या आणि शक्य असल्यास सकाळी 8 वाजेपर्यंत फोन वापरणे टाळण्याचा प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
• सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्रभर जागरण करण्यापासून टाळा. अनेक वेळा तरुण रात्रभर व्हिडिओ गेम खेळत राहतात. फोनवर बोलत राहतात किंवा अभ्यास करतात. पण दिवसा किंवा सकाळी उठल्यावर वाचन करणे खूप फायदेशीर आहे. रात्री जागरण केल्याने स्मरणशक्ती कमजोर होते. म्हणून रात्रभर जागरण करणे हेदेखील नियमाच्या विरुद्ध आहे.
advertisement
(सूचना - ही बातमी आयुर्वेदिक डॉक्टरांशी झालेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही)
Location :
Ranchi,Jharkhand
First Published :
February 26, 2024 3:15 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
मुलांची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर सिक्रेट टिप्स करा फॉलो, आठवड्याभरातच दिसेल फायदा