आग्रा येथील दुकानातील मिक्स फ्रूट चाट आणि ज्यूस खूप प्रसिद्ध आहे. इथे ज्यूस बनवला की लगेच विकला जातो. लांबून लांबून लोक हा ज्युस प्यायला येतात. दुकानाबाहेर रांगाच रांगा लागलेल्या असतात. मात्र एका फूड ब्लॉगरने या ज्युस मागचं सत्य उघडकीस आणलं आहे. त्यानं हा ज्युट बनवण्याची प्रक्रिया दाखवली. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही हा ज्युस पिण्याचा विचारही करणार नाही.
advertisement
10 वर्षाच्या मुलीचं लावलं लग्न! काही दिवसांतच झाला मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
हा व्हिडिओ आग्राच्या ज्यूसच्या दुकानातच रेकॉर्ड करण्यात आला आहे. फूड ब्लॉगरला प्रसिद्ध असल्यामुळे त्यानं या प्रसिद्ध ज्युसचा मेकिंग व्हिडीओ बनवला. मात्र त्याला प्रत्यक्षात वेगळंच दिसलं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही लोक ज्युससाठी फळे कापत आहेत. मात्र आजूबाजूला अनेक माशा उडताना दिसल्या. यानंतर बर्फाचा ब्लॉक धुऊन त्याची पावडर बनवण्यात आली. बर्फाचा चुरा झाल्यावर दूध थेट पेटीतून रसाच्या डब्यात ओतले. या दुधात माश्या होत्या. दूध न गाळताच तसंच टाकलं. माशीही रसात चिरडली. या घाणीत तयार केलेला ज्यूस पिण्यासाठी लोक लांबून येतात. व्हिडिओ शेअर होताच तो व्हायरल झाला.
ASHISH SINGH CHAUHAN नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केलाय. आणि असा ज्युस पिण्यासाठी लोक तासनतास वाट पाहतात.
