TRENDING:

Modak Recipe Video : उकड न काढता, पाकळ्या न पाडता, साचा न वापरता बनवा कळीदार उकडीचे मोदक, सर्वात सोपी रेसिपी

Last Updated:

सुबक पाकळ्यांचे उकडीचे मोदक बनवण्याची ही सर्वात सोपी अशी रेसिपी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : गणेशोत्सव म्हटलं की मोदक आलेच. गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ आपणा सर्वांनाही तितकाच आवडतो. पण मोदक दिसायला जितके आकर्षक, चवीला जितके चविष्ट तितकेच बनवणं कठीण. उकडीचे मोदक म्हणजे पिठाला उकड काढून बनवलेले मोदक आणि ते आकर्षक दिसतात ते त्यावरील कळ्यांमुळे. पण मोदकासाठी उकड काढणं आणि कळ्या पाडणं म्हणजे सोपं नाही. पण आता उकड न काढता, कळ्या न पाडता कळीदार उकडीचे मोदक बनवण्याची सर्वात सोप्या रेसिपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
मोदक रेसिपी
मोदक रेसिपी
advertisement

मोदक बनवताना सर्वात मोठी परीक्षा असते ती उकड काढताना आणि कळ्या पाडताना. उकड नीट झाली नाही तर मोदक फुटतात. कळ्याही नीट येत नाही. मोदकाला कळ्या पाडणं म्हणजे कलाच, ती सर्वांना जमत नाही. उकड नीट झाली तर सुरुवातीला मोदकांना कळ्या येतात पण त्या जोडताना गायब होतात. किंवा कळ्या एकत्र करताना त्यातून पुरण बाहेर पडतं, कळ्या नीट येण्यासाठी पुरण कमी टाकलं जातं. यामुळे मोदक खाताना फक्त पीठच लागतं. त्यामुळे हा प्रयत्न फसला की अनेक लोक सरळ साच्यात मोदक बनवतात. पण साच्यातील मोदकांच्या कळ्याही म्हणाव्या तितक्या आकर्षक वाटत नाही. शिवाय त्यात पीठही जास्त आणि पुरण कमी असंच होतं.

advertisement

बाप्पाच्या नैवेद्याची काळजी नको, पुण्यात 'या' ठिकाणी एका दिवसात तयार होतात 1 लाख मोदक!

त्यामुळे मोदक बनवणं म्हणजे लहान मुलांचा खेळ नाही. बड्याबड्यांनाही मोदक बनवायला जमत नाही. पण मोदक बनवण्याची अशी पद्धत ज्यामुळे लहान मुलंही मोदक बनवतील.

उकड न काढता मोदक बनवण्यासाठी तुम्ही एका भांड्यात मोदकाचं पीठ घ्या. दुसऱ्या भांड्यात पाणी अगदी कडकडीत गरम करून घ्या. ते मोदकाच्या पिठात ओतून लगेच चमच्याने नीट ढवळून घ्या. आता हे पीठ झाकून ठेवा. थोड्या वेळाने ते मळा.

advertisement

पाकळ्या न पाडता मोदक बनवण्यासाठी पीठ घेऊन त्याचा गोळा तयार करा. त्याची पारी तयार करून घ्या. यात मोदाकाचं सारण भरा. आता पूर्ण पीठ मोदकाच्या आकारात बंद करून घ्या. आता चमचा घ्या. चमच्याच्या मागच्या भागाने मोदकावर हलक्या हाताने चिर देत जा. साच्यापेक्षाही भारी आणि हातांनी पाडलेल्या पाकळ्यांसारख्या या कळ्या पडलेल्या तुम्हाला दिसतील. आता हे मोदक उकडून घ्या.

advertisement

SonaliJondhaleVlog आणि Trupti's Kitchen Katta युट्यूब चॅनेलवर हे व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत

तुम्हीही ट्राय करून पाहा आणि मोदक बनवण्याची ही पद्धत कशी वाटली ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/Viral/
Modak Recipe Video : उकड न काढता, पाकळ्या न पाडता, साचा न वापरता बनवा कळीदार उकडीचे मोदक, सर्वात सोपी रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल