बाप्पाच्या नैवेद्याची काळजी नको, पुण्यात 'या' ठिकाणी एका दिवसात तयार होतात 1 लाख मोदक!

Last Updated:

पुण्यातील 'या' ठिकाणी दिवसाला 1 लाखांपेक्षा जास्त मोदक तयार होतात.

+
News18

News18

पुणे, 18 सप्टेंबर : गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोद. गणेशोत्सवात घरोघरी मोदक केले जातात. ज्यांना मोदक घरी करणे शक्य नसते ती मंडळी मोदकाची ऑर्डर देतात. गणपतीचे 10 दिवस मोदकांना मोठी मागणी असते. ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक या निमित्तानं मिठाईच्या दुकानांमध्ये उपलब्ध असतात. या कालावधीत उकडीच्या मोदकांची मोठी मागणी असते. हे मोदक तयार करणारी पुण्यात एक फॅक्टरी आहे. या फॅक्टरीमध्ये दिवसाला तब्बल 1 लाख मोदक तयार होणार आहेत.
एक मोदक करण्यासाठी 15 सेकंद इतका कालावधी लागतो.हे मोदक पूर्ण पणे हाताने तयार केले जातात. त्यासाठी दिवसाला दोन ते अडीच हजार नारळ लागतात. मोदकासाठी आंबे मोहरचा तांदूळ वापरण्यात येतो.
नारळ चांगल्या पद्धतीनं खोवून त्यामध्ये गूळ आणि जायफळ टाकला जातो, हे मिश्रण पूर्णपणे एकजीव केले जाते. त्यानंतर पिठाची उकड 15 ते 20 मिनिटं घेतली जाते.
advertisement
हातानं पीठ मळून त्याचे गोळे तयार केले जातात. या गोळ्यात सारण घालून मोदक बनवतात.सुंदर सुबक आणि खायला देखील तितकाच स्वादिष्ट असा हा मोदकाचा प्रकार आहे. याची खरेदी तुम्ही ऑनलाईन फूड पोर्टलच्या माध्यमातूनही करू शकतात. पुण्यासह मुंबईतील ग्राहकांचाही याला चांगला प्रतिसाद आहे, अशी माहिती मेढी यांनी दिली.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
बाप्पाच्या नैवेद्याची काळजी नको, पुण्यात 'या' ठिकाणी एका दिवसात तयार होतात 1 लाख मोदक!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement