पौष्टीक नाचणी सत्वाच्या मोदकाचा बाप्पाला दाखवा नैवेद्य, पाहा सोपी रेसिपी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
बाप्पा घरी येणार म्हंटलं की बाप्पाला आवडणाऱ्या मोदकाची तयारी सुरू होते.
डोंबिवली, 18 सप्टेंबर : गणपती बाप्पाच्या आगमनाला आता काही तासच उरलेत. बाप्पा घरी येणार म्हंटलं की बाप्पाला आवडणाऱ्या मोदकाची तयारी सुरू होते. उकडीच्या मोदकाबरोबरच अंबा मोदक, गुलकंद मोदकाचा बाप्पाला नैवैद्य दाखविला जातो. डोंबिवलीत राहणाऱ्या मधुरा सावंत यांनी पौष्टीक नाचणी सत्वाचे मोदक तयार केलेत. घरच्या घरी झटपट हे मोदक कसे तयार करायचे याची रेसिपी त्यांनी सांगितली आहे.
साहित्य
तूप, नाचणीचे पीठ, खसखस, किसलेल सुख खोबरं , तीळ, गुळाची पावडर, काजू बदाम तुकडे, वेलची पावडर हे जिन्नस वापरून हा नाचणी सत्वाचा मोदक तयार केला आहे.
कसे तयार करणार?
पॅनमध्ये तूप घ्यावे त्यामध्ये नाचणीचे पीठ मंद आचेवर परतून घ्यावे. हे पिठाचा सुवास यायला लागल्यानंतर त्यामध्ये किसलेला खोबरं, तीळ, खसखस , काजू बदाम चे तुकडे खालून पुन्हा परतावे. त्यांनतर ते गार करण्यासाठी एका ताटात काढावे. ते गार झाल्यानंतर त्यामध्ये गुळाची पावडर आणि वेलची पावडर टाकावी. त्यानंतर ते पीठ एकजीव होण्यासाठी मिक्सर मधून बारीक करावे. त्यानंतर साच्याला थोडे तूप लावून मिक्सरमधून काढलेले पीठ साच्यात टाकावे. नाचणी सत्त्वाचे किंवा डाएटचे हे मोदक तयार होतात, असे मधुरा यांनी सांगितलं.
advertisement
नाचणी सत्त्वाचे मोदक चवीलाही हटके आणि मस्त लागतात. या मोदकांमुळे शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. अनेक जणांना डायबिटीस किंवा इत्रा काही कारणांमुळे पथ्य असतात. मात्र हा मोदक पथ्य पाळणाऱ्या देखील प्रसाद म्हणून सहज खता येईल. हे मोदक बाप्पासह लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडतील यात काही शंका नाही, असा विश्वास मधुरा यांनी व्यक्त केला.
Location :
Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
First Published :
September 18, 2023 12:03 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
पौष्टीक नाचणी सत्वाच्या मोदकाचा बाप्पाला दाखवा नैवेद्य, पाहा सोपी रेसिपी