सिंहासारखी डरकाळी फोडणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. जर का तुम्ही हा व्हिडीओ पाहताना डोळे बंद केले आणि फक्त आवाज ऐकला तर तुम्हाला तो सिंहाचाच आवाज वाटेल. कुणी माणसाने हा आवाज काढला आहे, यावर विश्वासच हसणार नाही. इतका हुबेहून आवाज या मुलीनं काढला आहे.
viral news: मुलाच्या डोळ्यात दिसलं काहीतरी विचित्र, डॉक्टरकडे जाताच चक्रावली आई!
advertisement
इथं पाहा व्हिडीओ
रिले असं या मुलीचं नाव आहे. तिची आई एमीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. टिकटॉकवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ एक्सवरही शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओत मुलीची आई तिला सिंहासारखा आवाज काढायला लावते. मुलगी सिंहासारखी गर्जना करते. यानंतर मुलीची आई तिला हे ती कसं काय करते, तिला हे कसं जमतं असं विचारते. यावर मुलगी तिला सर्व समजावून सांगते. काय कधी कसं करायचं हे ती सांगते.
हा व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्य वाटतं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आणि तुम्हाला अशी डरकाळी फोडता येते का, ते प्रयत्न करून पाहा आणि आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉकसमध्ये नक्की सांगा.