अमेरिकेतील या व्यक्तीने स्वतः हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सकाळी 7.30 वाजता एका घरातून ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर एक माणूस धावत त्याच्या घराच्या लिव्हिंग रूममध्ये येतो. तिथे तो आवाज नेमका कसला हे पाहताच तो माणूस थक्क झाला. तिथं एक पोपट होता.
ऑनलाईन रेटिंग पाहून बुक केलं हॉटेल, रूममध्ये जाताच फुटला घाम, असं पाहिलं काय? Watch Video
advertisement
व्यक्तीला जो आवाज ऐकून आला तो या पोपटाने काढला होता. पोपटाचा आवाज ऐकून मालक धावत आला. त्याने लगेच पोपटाला पकडलं. त्याने पोपटाला शांत राहण्यास सांगितलं. शेजारी पोलिसांकडे तक्रार करतील असंही तो म्हणाला. त्यानंतर मालकाने सांगितलं की तो तुरुंगात जाणार नाही. यामुळे असा अंदाज बांधला गेला की या पोपटाच्या वर्तनासाठी त्याला याआधी तुरुंगवास भोगावा लागला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये 'पोपट कॉल्स द कॉप्स!' ही आणखी एक क्लिप तुरुंगातून पळून जाण्याबद्दल सांगताना दिसली. अनेक देशांमध्ये घरातून असा आवाज आल्यास पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई केली जाते.
@imtequilabird या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. इन्स्टाग्राम रीलचे कॅप्शन आश्चर्यकारक आहे: 'मी कधीही परत जाणार नाही!'
OMG! स्पेसमधून पहिल्यांदाच दिसलं पृथ्वीवरील असं दृश्य; पाहून शास्त्रज्ञही झाले थक्क
हा काही सामान्य पोपट नाही. पिवळी चोच असलेला हा अमेझॉन पोपट, ज्याचं नाव टकीला असं आहे. हा पोपट बोलण्यात आणि नक्कल करण्यात पारंगत आहे. या व्यक्तीचं इन्स्टाग्राम अकाऊंट या पोपटाच्या खोडसाळपणाच्या व्हिडीओने भरलेले आहे. मालकाचं म्हणणं आहे की टकीलाला लहानपणापासूनच अशा सवयी शिकवल्या जात होत्या, पण आता हा खोडसाळपणा शेजाऱ्यांसाठी डोकेदुखी बनला आहे.