ऑनलाईन रेटिंग पाहून बुक केलं हॉटेल, रूममध्ये जाताच फुटला घाम, असं पाहिलं काय? Watch Video
- Published by:Priya Lad
Last Updated:
One Star Hotel Video : लक्झरी हॉटेल्सच्या चकचकीत जगातून दूर, जर तुम्ही कधी वन स्टार हॉटेलची कल्पना केली असेल, तर हा व्हिडीओ तुम्हाला तुम्हाला धक्का देईल.
नवी दिल्ली : बाहेर कुठे फिरायला जायचं म्हटलं की हॉटेल बुकिंग आलंच. हॉटेल बुक करायचं म्हणजे ऑनलाइन रेटिंग, प्रतिक्रिया चेक केल्या जातात. अशीच एक व्यक्ती ऑनलाईन रेटिंग पाहून एका हॉटेलमध्ये गेली. पण रूममध्ये पाय ठेवताच तिला असं दृश्य दिसलं की घाम फुटला. संपूर्ण रूम फिरल्यानंतर तर तो पुरता हादरला. या हॉटेल रूमचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
एका व्यक्तीने त्याने भेट दिलेल्या हॉटेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आतापर्यंत तुम्ही 5 स्टार, 7 स्टार मिळालेल्या लक्झरी हॉटेल्सचे बरेच व्हिडीओ पाहिले असतील. पण या व्यक्ती व्हिडीओत वन स्टार हॉटेल दाखवलं आहे. या हॉटेलच्या रूम पाहून तो खूप घाबरला आहे. मेरिकन ट्रॅव्हलर आणि कंटेंट क्रिएटर बिलालने इन्स्टाग्राम अकाऊंट bilaldawson आणि YouTube चॅनेलवर शेअर केलेला हा व्हिडीओ. लक्झरी हॉटेल्सच्या चकचकीत जगातून दूर, जर तुम्ही कधी वन स्टार हॉटेलची कल्पना केली असेल, तर बिलाल डॉसनचा हा व्हिडीओ तुम्हाला तुम्हाला धक्का देईल.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता त्याने सॅन फ्रान्सिस्कोमधील सर्वात वाईट रेटिंग असलेल्या 1 स्टार हॉटेल्सना भेट दिली आहे. सनी साइड हॉटेल, हॉटेल ट्रॉपिकाना आणि अल्ड्रिक हॉटेलमध्ये तो गेला. जिथे तो घाण, असुरक्षितता आणि आरोग्य धोक्यांमुळे हैराण झाला. तो म्हणाला, "हे व्हिडिओ बनवणं ही माझी सर्वात मोठी चूक होती. मला असं वाटलं की मी वेडा झालो आहे."
advertisement
व्हिडिओ सॅन फ्रान्सिस्कोच्या धोकादायक टेंडरलॉइन भागात सुरू होतो, जिथं ड्रग्ज, गुन्हेगारी आणि बेघरपणाचं प्रमाण जास्त होतं. बिलालने ऑनलाइन रेटिंग वाचलेल आणि सनी साइड हॉटेल बुक केलं, ज्याचं रेटिंग एकपेक्षा कमी स्टार होते.
advertisement
चेक इन केल्यावर, रिसेप्शनिस्टने विचारलं, "तुम्ही आधी राहिला आहात का?" नंतर त्याला रूम नंबर 309 देण्यात आल. पण काही गोंधळामुळे त्याला 409 मध्ये हलवण्यात आलं. कर्मचारी म्हणाला, "या नवीन रूम आहेत." कर्मचाऱ्यांनी त्याला दुसऱ्या मजल्यावर हलवण्यास नकार दिला. नंतर एका कर्मचाऱ्याने विचारलं, "तुम्हाला इथे आवडतं का?" नंतर आवाजाच्या तक्रारीनंतर त्याला खालच्या मजल्यावरील अपार्टमेंट सुचवलं.
advertisement
रूममध्ये प्रवेश करतातच बिलालला धक्का बसला. लहान जुने फर्निचर, एक रेफ्रिजरेटर, एक मायक्रोवेव्ह, केबल टीव्ही होती, पण एअर कंडिशनिंग नव्हतं. खूप गरम होत होतं. भिंती पाहून पैसे पाण्यात गेल्यासारकंच वाटलं. कागदाच्या तुकड्यांनी पॅच केलेले छिद्र आणि बुरशीचे ट्रेस अशा भित्तिचित्रांनी झाकलेल्या होत्या. चादरींवर स्पर्मचे डाग होते. फरशी चिकट होत्या, खुर्ची खिळखिळी झाली होती.
advertisement
व्हिडीओ पाहिल्यावर त्यावर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. एका युझरने, आपल्या वडिलांचा 2023 मध्ये इथं मृत्यू झाल्याचं सांगत, हा व्यवसाय बंद होईल अशी आशा केली आहे. दुसऱ्या युझरने, "भिंतींवर ग्राफिटी, होल, ड्रॉवरमध्ये कंडोम, एसी नाही, चादरींमध्ये जळाल्याचे छिद्र यावरून रात्रभर ड्रग्जचे व्यवहार चालू असल्याचं तुम्हाला दिसतं." तिसऱ्या युझरने ही जागा मी आतापर्यंत पाहिलेली सर्वात भयानक जागा होती. मला इथं बॅक्टेरियाचा संसर्ग झाला आणि मी खूप आजारी पडले, असं म्हटलं आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 10, 2025 11:36 AM IST
मराठी बातम्या/Viral/
ऑनलाईन रेटिंग पाहून बुक केलं हॉटेल, रूममध्ये जाताच फुटला घाम, असं पाहिलं काय? Watch Video