जगभरात औषधी कारणांसाठी आणि पदार्थांच्या गोडव्यासाठी मधाचा वापर केला जातो. म्हणजेच जगभरात दररोज कित्येक किलो मधाचा वापर होतो. एका रिसर्चमधील निष्कर्षांनुसार, एक हजार 100 मधमाशा मिळून एक किलो मध तयार करतात. त्यासाठी त्यांना सुमारे 40 लाख फुलांमधील मकरंद शोषून आणावा लागतो. सरासरी एक मधमाशी तिच्या संपूर्ण आयुष्यात एका चमच्यातील 12व्या भागाइतका मध तयार करू शकते.
advertisement
Coconut Water : तुम्हीही या पद्धतीनं नारळ पाणी पिता का? मग फायद्याऐवजी होईल नुकसान
विविध फुलांच्या मकरंदापासून मधाची निर्मिती होते त्यामुळे तो कमालीचा औषधी असतो. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, कार्बोहायड्रेट, अमिनो अॅसिड इत्यादी पोषकतत्त्वं असतात. या शिवाय त्यात अँटिबॅक्टेरियल, अँटिफंगल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मही असतात. त्यामुळे खोकला, घशातील खवखव, सर्दी, कफ इत्यादी आजार कमी करण्यासाठी मधाचा वापर होतो. वजन कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, शरीरावर झालेल्या जखमा भरण्यासाठी देखील मधाचा वापर होतो. सौंदर्य प्रसाधनांमध्येही मधाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
तुम्ही दररोज एक ते दोन चमचे शुद्ध मध पिऊ शकता. काहीजण कोमट पाणी किंवा दुधामध्ये मध टाकून पितात. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाण्यात मध घालून पिणं शरीरासाठी लाभदायक आहे. कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी गरम दुधात मध घालून प्यायल्याने निद्रानाशाचा त्रास कमी होतो. या शिवाय मध हा ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत असून, त्याने शरीराला ताकद मिळते.