डोंगरी भागातून गाडी जात असताना अचानक समोरच्या ट्रकवर मोठा दगड कोसळतो. हा अपघात एवढा थरारक होती की ट्रकचा चक्काचूर झाला. सुदैवानं या भयंकर अपघातातून सर्वजण बचावले.
VIDEO : किस केलं मग मारला डोळा, तरुणीनं कुटुंबासमोरच तरुणासोबत केलं असं कृत्य!
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याने गाडी जात आहे. संपूर्ण डोंगराळ रस्ता आहे आणि अचानक एक मोठा दगड खाली कोसळतो. तेथून जाणाऱ्या ट्रकवर तो आदळतो आणि ट्रकचा अक्षरशः चुराडा होतो. मागे असलेल्या कारच्या डॅशकॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कैद झालंय.
advertisement
CNN चिलीच्या अहवालानुसार, सॅन माटेओ येथील Huanchor येथे गेल्या शनिवारी झालेल्या भूस्खलनातून दोन व्यावसायिक ट्रकचे चालक थोडक्यात बचावले. मात्र, मध्य महामार्गाचा काही भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. दगड इतका जड होता की रस्त्यावर खोल खड्डा तयार झाला होता. सध्या सॅन माटेओमध्ये मुसळधार पाऊस पडत असून या भागात भूस्खलन आणि खडक कोसळत आहेत.
दरम्यान, डोंगरी भागात अशा घटना अचानकपणे घडत असतात. पावसाळा सुरु असल्यावर तर प्रकर्षाने असे अपघात घडतात. अनेक भयंकर घटना घडतात. त्यामुळे पावसाळ्यात अशा भागांमध्ये अलर्टही जारी केला जातो. मात्र पावसाळ्याशिवायही अशा घडना घडू शकतात. डोंगरातून खडक, दगड कधीही कोसळू शकतात.
@RealUntoldStory नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 45 सेकंदांचा हे भयानक दृश्य पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.
