VIDEO : किस केलं मग मारला डोळा, तरुणीनं कुटुंबासमोरच तरुणासोबत केलं असं कृत्य!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
भारतातील लग्नप्रथा खूप निरनिराळ्या आहेत. प्रत्येक ठिकाणी लग्नाचे कार्यक्रम, विधी वेगळे असतात, प्रत्येकाचं महत्त्वही खास असतं. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु असून अनेकांची लग्नाची लगबग सुरु आहे.
नवी दिल्ली : भारतातील लग्नप्रथा खूप निरनिराळ्या आहेत. प्रत्येक ठिकाणी लग्नाचे कार्यक्रम, विधी वेगळे असतात, प्रत्येकाचं महत्त्वही खास असतं. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु असून अनेकांची लग्नाची लगबग सुरु आहे. सोशल मीडियावर लग्नासंबंधीत अनेक व्हिडीओ, फोटो समोर येत आहेत. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होतोय, ज्यामध्ये तरुणी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला किस देत, डोळा मारते.
घरामध्ये सगळे पाहुणे मंडळी जमली आहेत आणि एक तरुणी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला गुपचूप किस देते आणि डोळाही मारते. हे पाहून मुलगा लागतो आणि हसायला लागतो. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं असून व्हिडीओ इंटरनेटवर खळबळ माजवतोय.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलगा मुलीकडे पाहतो आणि तीदेखील त्याच्याकडे पाहत असते. मुलगा सोफ्यावर बसलेला आहे आणि मुलगी दरवाजामध्ये उभी आहे. मुलगा मुलीकडे पाहताच ती त्याला दुरुन किस करते आणि मग डोळा मारते. हे पाहून मुलगा लाजतो आणि हसतो.
advertisement
lavanyaravikumar81 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ काहीच वेळात तुफान व्हायरल झाला. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. निरनिराळ्या कमेंट लोक करताना दिसत आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी व्हिडीओला शेअरही केलंय.
advertisement
दरम्यान, सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. अचानक कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येऊ शकतो. लहानग्यांपासून वृद्धापर्यंत सर्वांचेच निरनिराळे व्हिडीओ चर्चेत असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 05, 2024 4:57 PM IST








