advertisement

सोन्यापासून बनलाय 'हा' लघुग्रह, तिथलं सोनं पृथ्वीवर आणता येऊ शकतं का?

Last Updated:

नासाने एक यान एका खास लघुग्रहावर पाठवलंय. त्याचं नाव 16 सायकी असं आहे. हा लघुग्रह सोन्याचा बनलेला असल्याचं सांगितलं जातंय. याशिवाय, त्यात अत्यंत मौल्यवान धातूंचा खजिनाही आहे.

सोन्यापासून बनलाय 'हा' लघुग्रह
सोन्यापासून बनलाय 'हा' लघुग्रह
नवी दिल्ली : नासाने एक यान एका खास लघुग्रहावर पाठवलंय. त्याचं नाव 16 सायकी असं आहे. हा लघुग्रह सोन्याचा बनलेला असल्याचं सांगितलं जातंय. याशिवाय, त्यात अत्यंत मौल्यवान धातूंचा खजिनाही आहे. या लघुग्रहावरून सोनं मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर आणता येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सायकी या लघुग्रहाचा शोध इटालियन खगोलशास्त्रज्ञ ॲनिबेल डी गॅस्पॅरिस यांनी लावला होता. त्या वेळेस शोधलेला हा 16वा लघुग्रह होता, म्हणून त्याला कधी कधी 16 सायकी म्हणतात. प्राचीन ग्रीक मिथकातल्या आत्म्याच्या देवीच्या नावावरून हे नाव देण्यात आलंय. या लघुग्रहाची रचना बटाट्यासारखी असून, त्यात लोह, सोनं, प्लॅटिनम, निकेल या मौल्यवान धातूंचा समावेश आहे.
पृथ्वीपासून किती दूर आहे ग्रह
सायकी लघुग्रह पृथ्वीपासून 50 लाख किलोमीटर अंतरावर आहे, तिथं प्रकाश पोहोचण्यासाठी 31 मिनिटं लागतात. नासाचं सायकी मिशन सहा वर्षांत तिथे पोहोचेल. सायकीच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ सुमारे 165,800 चौरस किलोमीटर आहे. ते तमिळनाडू राज्यापेक्षा सुमारे 35,000 चौरस किलोमीटर जास्त आहे.
advertisement
एक अमूल्य खजिना
सायकीवर सोनं किती आहे या विषयावर बरंच काही लिहिलं गेलंय. त्याची किंमत काय आहे? तिथं असलेल्या सोन्याचं प्रमाण पृथ्वीच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त असेल, असं म्हटलं जातंय. ते सोनं पृथ्वीवर आणलं तर प्रत्येकाला सोन्याने मढवता येऊ शकतं, असं म्हटलं जातं.
नासाला का आहे रस?
या लघुग्रहावर मोहीम पाठवण्याच्या नासाच्या निर्णयामागचं कारण खास आहे. लघुग्रहांमध्ये कार्बन, पाणी आणि इतर घटक असतात. ते सूर्यमालेत ग्रह तयार बनताना तयार झालेले असतात. यामध्ये धातू नसतात. त्यामुळे अशा लघुग्रहांमधला धातू कुठून आला, याबद्दलच्या तपासातून अनेक रहस्यं उघड होतील. इथून पृथ्वीवर सोनं कसं आणता येईल हे शोधण्यासाठी यानंतर नासा पुन्हा अशी मोहीम राबवू शकते.
advertisement
शास्त्रज्ञांना काय वाटतंय?
खगोलशास्त्रज्ञांना या लघुग्रहामध्ये खूप रस आहे कारण तिथं सोन्यासह अनेक धातू आहेत. शास्त्रज्ञांना वाटतंय, की ते ग्रहांच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यात निघालेल्या धातूपासून बनलेलं असावं.
सोनं आणणं अवघड
काही अंदाजानुसार, 140 मैल रुंद लघुग्रह 16 सायकीवर 10,000 क्वाड्रिलियन डॉलर किमतीचं लोखंड, निकेल आणि सोनं आहे. सायकी हा एखाद्या ग्रहाचा उघडा धातूचा तुकडा असू शकतो. त्याने आपल्या सूर्यमालेच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात टक्कर झाल्यामुळे त्याचा खडकाळ बाह्य स्तर गमावलेला असू शकतो. नासाच्या मते, सायकी कदाचित खडक आणि धातूच्या मिश्रणाने बनला असावा. त्यात धातूचं प्रमाण 30% ते 60% आहे. या लघुग्रहावरून सोनं कधी पृथ्वीवर आणता येईल का, असा विचार फक्त कल्पनेतच होऊ शकतो, असंही म्हटलं जातंय. ते सोनं पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात आलं तरी सोन्याचं महत्त्वही कमी होईल.
view comments
मराठी बातम्या/Viral/
सोन्यापासून बनलाय 'हा' लघुग्रह, तिथलं सोनं पृथ्वीवर आणता येऊ शकतं का?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement