उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील ही घटना. मिळालेल्या माहितीनुसार, बिथूर भागातील एका कारखान्यात काम करणारा तरुण पत्नीसह भाड्याने राहतो. कारखान्यात गेल्यावर पत्नी दुसर्या कोणाशी तरी मोबाईलवर बोलत असल्याचा संशय त्याला आला. तिचे कोणाशी तरी अफेअर आहे असं त्याला वाटत होतं.
त्याने मित्राकडून मोबाईलमधील रेकॉर्डिंगची सिस्टीम समजून घेतली, त्यानंतर गुपचूप पत्नीचा मोबाइल घेतला आणि त्यात कॉल रेकॉर्डिंग ॲप इन्स्टॉल केलं. यानंतर पत्नी कोणाशीही बोलेल, तिचे रेकॉर्डिंग ऐकू येईल, असा विचार करून त्याने मोबाईल बाजूला ठेवला. यानंतर तो कारखान्यात ड्युटीसाठी गेले.
advertisement
परत आल्यावर त्याचं लक्ष पत्नीच्या मोबाईलकडेच होतं. बायकोचा मोबाईल घेऊन तो टेरेसवर गेला आणि दिवसभरात तिच्याशी बोललेल्या प्रत्येकाचं रेकॉर्डिंग ऐकू लागला. इकडे बायको घरात तिचा मोबाईल शोधत होती. शोधता शोधता ती गच्चीवर पोहोचली. पती मोबाईलवर रेकॉर्डिंग ऐकत असल्याचं तिच्या लक्षात आलं.
यावरून दोघांमध्ये वाद झाला. पत्नीचा राग एवढा वाढला की तिने लाटणं उचलून पतीला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिलं आणि पुन्हा घरात येऊ नकोस असं सांगितलं. पत्नीच्या मारहाणीमुळे घाबरलेला पती थेट बिठूर पोलीस ठाण्यात गेला.
पोलीस स्टेशन प्रभारी प्रेम नारायण विश्वकर्मा यांनी सांगितलं की, पत्नी मेडिकल कॉलेजमध्ये कर्मचारी आहे, तर तिचा पती एका मसाला कंपनीत कर्मचारी आहे. बायको प्रभारींशी बोलायची. याचा तिच्या पतीला संशय आला. त्यामुळे त्याने पत्नीचा मोबाईल तपासला. तिन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. पतीला ज्या व्यक्तीवर संशय होता तो आपल्या मुलासह आला होता. तो म्हणाला की मला एवढा मोठा मुलगा आहे, मला त्याच्या बायकोची काय करायचं आहे. त्याला विनाकारण संशय येत होता.
त्यानंतर पतीने पत्नीची माफी मागितली आणि पत्नीसह तो घरी गेला. पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले कॉल रेकॉर्डिंग ॲप डिलीट केले.