मुलाने होणाऱ्या बायकोचं नव्हे, तर आईचं ऐकलं
मुलीने लिहिलं आहे की, जेव्हा त्याने मला हे सांगितलं, तेव्हा मला धक्का बसला, कारण आम्ही दोघेही याबद्दल खूप दिवसांपासून बोलत होतो आणि बचतही करत होतो. पण त्याच्या आईला तिच्या आवडीचं योग्य ठिकाण सापडलं आणि तिने त्याला पैसे द्यायला राजी केलं. मुलीने सांगितलं की, इथेच गोष्ट संपली नाही, उलट होणाऱ्या नवऱ्याने माझ्यावर आरोप केला की, मी पैसे वाचवायला खूप वेळ लावत आहे... असं चालू राहिलं तर आम्ही कधीच घर घेऊ शकणार नाही.. दुसरीकडे, त्याच्या आईने त्याला घर घेण्याचा सोपा मार्ग सांगितला, त्यामुळे त्याने त्याच्या आईसोबत घर घेतलं.
advertisement
मुलीच्या घरातलेही तिच्यावर करताहेत टिका
मुलीने लिहिलं आहे की, पण ही कल्पना मला अस्वस्थ करणारी होती, कारण ते त्याच्या आईचं घर होतं... आणि मला तिथे कायमचं राहायचं होतं. या बोलणीनंतर मी ठरवलं की, जो माझ्या जागेचा आदर करत नाही, त्याच्यासोबत मी राहू शकत नाही... मात्र, माझ्या कुटुंबाने माझ्या या निर्णयावर खूप कठोर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी नाटक करत आहे... हे फक्त एक घर आहे. यासाठी लग्न मोडणं योग्य नाही.
युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया
पोस्ट केल्याच्या काही तासांतच ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. एका युजरने मुलीला पाठिंबा देत लिहिलं की, त्याने तुला सांगितलं नाही, त्याने तुला या निर्णयात सहभागीही करून घेतलं नाही... आणि आता तो फक्त तुला शांतपणे येऊन त्याच्यासोबत राहावं अशी अपेक्षा करतोय. दुसऱ्या युजरने लिहिलं की, मुलाला वाटलं की मालमत्तेच्या बाबतीत स्वतःची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे; भविष्यात ते कधी वेगळे झाले, तर मुलीसाठी समस्या होईल.
हे ही वाचा : मेहुण्यावरच भाळली मेहुणी, बहिणीचा मोडला संसार, विचित्र Love Story ऐकून पोलीसही चक्रावले!
हे ही वाचा : सारखपुडा झालेला होता, दोघे पार्कमध्ये फिरत होते, एक चूक घडली अन् दोन्ही कुटुंबाना भोगावा लागतोय त्रास!
