आग्रा : परदेशी जातीचे कुत्रे पाळण्याचा एका व्यक्तीला छंद होता. मात्र, हा छंद त्याच्या इतक्या अंगलट आला की त्याचे कुटुंबात मोठा वाद निर्माण झाला. या कुत्र्यामुळे पती-पत्नीमध्ये झालेला वाद आता थेट पोलिसात पोहोचला आहे.
काय आहे नेमकी घटना -
पतीला परदेशी जातीचे कुत्रे खूप आवडतात आणि पत्नीला कुत्रे अजिबातच आवडत नाहीत. इतकेच नाही तर जेव्हा पतीने आपल्या पाळीव कुत्र्याचे भांडे खराब झाल्याचे पाहिले तेव्हा तो पत्नीवर रागावला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर हे प्रकरण इतके वाढले की, हे पोलीस ठाण्यात पोहोचले.
advertisement
लग्नाआधीच नवरदेवाने केली ही मागणी, नवरीने विनंती केली तरी ऐकलं नाही, धक्कादायक घटना
2 वर्षांपूर्वी झाले होते लग्न -
जगदीशपुर पोलीस ठाणे हद्दीतील तरुणीचे 2 वर्षांपूर्वी दिल्लीत राहत असलेल्या एका तरुणासोबत लग्न झाले होते. तिचा पती एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करतो. महिलेच्या पतीला परदेशी जातीचे कुत्रे पाळण्याची आवड आहे. 6 महिन्यांपूर्वी पती जेव्हा शहराच्या बाहेर गेला तेव्हा त्याने आपल्या पाळीव कुत्र्याची जबाबदारी पत्नीवर दिली.
मात्र, पती जेव्हा परत आला तेव्हा त्याला कुत्र्याचे भांडे स्वच्छ नसल्याचे दिसले. ज्या भांड्यात कुत्रा जेवण करत होता, ते खराब होता. यावरुन पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की पत्नीने सासर सोडले आणि माहेरी येऊन राहू लागली.
यानंतर आता हे प्रकरण आग्रा येथील पोलिसांच्या कुटुंब समुपदेशन केंद्रात पोहोचले. याठिकाणी त्यांचे समुपदेशन केले जात आहे. समुपदेशक अमित गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दोघांना समुपदेशनासाठी बोलावण्यात आले होते. मात्र, तरी यावर तोडगा निघाला नाही.
पायऱ्यांखाली चुकूनही ठेऊ नका या वस्तू, घरात येईल नकारात्मकता, काय कराल?
ते म्हणाले, समुपदेशनादरम्यान, पतीने सांगितले की, पत्नीही आधी कुत्र्यावर प्रेम कराचयी. मात्र, आता ती त्याच्यावर प्रेम करत नाही. पण मी कुत्रा सोडू शकत नाही. तर पत्नीने म्हटले आहे की, मी कुत्र्यासोबत राहू शकत नाही. त्यामुळे सध्या दोघांना पुढची तारीख देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.